Chandra Gochar in Swati Nakshatra Effect : वैशाख पौर्णिमा तिथीला म्हणजे १ मे २०२६ रोजी पहाटे २ वाजून १६ मिनिटांनी चंद्र राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल आणि २ मे पर्यंत या नक्षत्रात राहील. मन आणि मातेचा कारक असलेल्या चंद्राचे पौर्णिमा तिथीला होणारे हे गोचर चार राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. हा नक्षत्र बदल काही राशींच्या लोकांच्या मनात स्थिरता आणू शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीसह आर्थिक लाभ मिळू शकतो. लोकांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नेमकं कोणत्या राशींना चंद्राचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरेल जाणून घेऊ…
मिथुन
वैशाख पौर्णिमेला होणारे हे चंद्राचे स्वाती नक्षत्रातील गोचर या राशीच्या लोकांना शुभ ठरू शकते. त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, यामुळे मन शांत राहील. कुटुंबासह चांगला वेळ घालवता येईल. मोठे यश मिळवता येईल आणि व्यावसायिक निर्णय घेता येतील, यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कर्क
चंद्राचा नक्षत्र बदल कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरेल. रखडलेल्या प्रोजेक्ट्सना गती मिळेल. शासकीय लाभार्थ्यांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल. आईच्या आरोग्यात सुधारणा होण्याचे संकेत आहेत आणि कौटुंबिक मतभेद मिटतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे.
सिंह
चंद्राचा नक्षत्र बदल सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि पैसे कमावण्याचे अनेक मार्ग खुले होतील. मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नवीन नोकरीचा शोध यशस्वी होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या समस्या ऐकून घेतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी राहूचा कुंभ राशीत प्रवेश शुभ काळ घेऊन येईल. व्यवसायात भरीव नफा मिळेल. परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील. कौटुंबिक संबंधांमधील चालू असलेले संघर्ष मिटतील. मानसिक शांती लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
