Chandra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
पंचांगानुसार, चंद्र ४ ऑक्टोबरच्या संध्याकाळी स्वतःच्या राशीत, म्हणजेच कर्क राशीत, गोचर सुरू करेल आणि ६ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून १७ पर्यंत तेथेच राहील. या राशीत गुरू आधीपासूनच असल्याने, येथे गजकेसरी योग देखील तयार होईल, जो एक अत्यंत शुभ योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा चार भाग्यवान राशी आहेत ज्यांच्यासाठी चंद्राचे गोचर अत्यंत शुभ ठरेल. या राशींसाठी सुवर्णकाळ ४ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
चंद्राचे गोचर नशीब चमकवणार
कर्क (Kark Rashi)
तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करत आहे. परिणामी, या संक्रमणामुळे तुमच्या राशीला सर्वाधिक फायदा होईल. करिअरमध्ये प्रचंड वाढ होईल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यावसायिकांना नवीन सौद्यांमधून लक्षणीय नफा मिळू शकतो. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. त्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी देखील मिळू शकते.
तूळ (Tula Rashi)
अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चंद्राचे कर्क राशीतील संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी देखील शुभ ठरेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात नवीन आणि मोठे प्रकल्प मिळू शकतात. इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. वृश्चिक राशीसाठी चंद्राचे गोचर शुभ राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामासंबंधित दौरे यशस्वी ठरतील. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
मीन (Meen Rashi)
तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला लाभ मिळू शकतो. चंद्राचे गोचर मीन राशीसाठी भाग्यवान ठरेल. अचानक अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला लाभ मिळू शकतो आणि भागीदारीच्या कामात भरघोस नफा अपेक्षित आहे. जे नवीन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळेल. मुलांकडून काही मोठी आनंदाची बातमी येऊ शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
