Chandra Gochar 2026: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. पंचांगानुसार, चंद्र ०३ सप्टेंबर रोजी सकाळी ०७ वाजून २६ मिनिटांनी मेष राशीतून उच्च राशी असलेल्या वृषभ राशीत गोचर करेल. चंद्राचे हे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल.
चंद्राचे राशी भाग्योदय करणार
मेष (Mesh Rashi)
चंद्राचा वृषभ राशीतील प्रवेश मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा वृषभ राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या जातकांना आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता असल्याने बजेटकडे लक्ष द्यावे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवादाला विशेष महत्त्व राहील. जुने मित्र किंवा संपर्क पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. कला, सौंदर्य, मीडिया, फॅशन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना जुन्या प्रोजेक्टमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
