Chandra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.

पंचांगानुसार, चंद्र ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी बुध राशीत गोचर करणारअसून जो ४ ऑक्टोबरपर्यंत तो याच राशीत राहणार आहे. चंद्राचे हे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होईल.

चंद्राचे गोचर भाग्य बदलणार

मेष (Mesh Rashi)

चंद्राचे गोचर मेष राशीसाठी शुभ ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. पदोन्नती आणि पगारवाढीची दाट शक्यता आहे. एक मोठा व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे अडकलेला निधी परत मिळण्यास मदत होईल.

मिथुन (Mithun Rashi)

चंद्राचे गोचर मिथुन राशीसाठी फलदायी ठरेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमची निर्णयक्षमता मजबूत होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या धोरणांचे कौतुक होईल. तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. हे गोचर विशेषतः मीडिया, लेखन, विपणन किंवा बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी शुभ असेल.

सिंह (Singh Rashi)

चंद्राचे गोचर सिंह राशीसाठी इच्छापूर्ती करणारे ठरेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. एक मोठा व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे.

तूळ (Tula Rashi)

चंद्राचे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायातील अडथळे दूर होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ आहे. तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी नोकरी मिळू शकते. करिअरमध्ये प्रचंड प्रगतीची चिन्हे आहेत. भागीदारीतील काम फायदेशीर ठरू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)