Chandra Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री उशीरा चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत गोचर करेल. वृषभ ही चंद्राची उच्च राशी मानली जाते, त्यामुळे या राशीत प्रवेश करताच चंद्राचे बळ वाढेल. चंद्राच्या या मजबूत स्थितीमुळे सर्व राशींच्या जीवनावर काही ना काही प्रभाव नक्कीच दिसून येईल. मात्र, १२ राशींपैकी ३ अशा राशी आहेत. ज्यांच्यासाठी चंद्राचे हे राशी परिवर्तन अत्यंत फलदायी ठरू शकते.

१. वृषभ (Taurus)

चंद्राचे हे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. चंद्राची ही स्थिती तुमचा आत्मविश्वासात वाढवू शकते. तसेच तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक होऊ शकते. अडकलेली कामे आता पूर्ण होऊ शकतात. ज्या लोकांनी नवीन नोकरीसाठी परीक्षा किंवा मुलाखत (Interview) दिली आहे, त्यांना यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यावसायिकांना या काळात मनासारखी किंवा अपेक्षित डील मिळू शकते. चंद्र तुम्हाला प्रेम आणि कौटुंबिक जीवनातही आनंदाचे क्षण घेऊन येईल.

२. कर्क (Cancer)

चंद्र कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे चंद्राचे गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. या गोचरानंतर तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. काही लोक स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यात यशस्वी होऊ शकतात. मोठ्या भावा-बहिणींसह चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

३. कुंभ (Aquarius)

चंद्राचे गोचर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येईल. या गोचरामुळे तुम्हाला भौतिक सुख-सोयी मिळतील. काही लोक जमीन, घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकतात. कौटुंबिक किंवा वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठे यश मिळण्याचे योग आहेत. या राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. चंद्र तुमची सर्जनशीलता (Creativity) वाढवेल, ज्यामुळे कला क्षेत्रातील लोकांना विशेष यश व सन्मान मिळू शकतो.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)