Chandra Gochar: चंद्राच्या हालचालीत होणाऱ्या बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. काही राशींवर त्याचा शुभ परिणाम होतो, तर काहींवर अशुभ परिणाम दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन, भावना आणि सुख-सुविधांचा कारक ग्रह मानला जातो. आज संध्याकाळी चंद्राने आपली रास बदलली आहे. या काळात काही राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती, नातेसंबंध अधिक मजबूत होणे आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.

चंद्र गोचराचा प्रभाव किती दिवस राहणार?

१० जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजून ४४ मिनिटांनी चंद्राने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. शुक्राची रास असलेल्या वृषभ राशीत चंद्राचे हे गोचर १२ जुलैपर्यंत राहणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ३ राशींवर नशिबाची विशेष कृपा राहील आणि त्यांना अनेक क्षेत्रांत यश मिळण्याची शक्यता आहे.

चंद्र गोचरामुळे ‘या’ ३ राशींना होणार फायदा

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी चंद्राचे हे गोचर फायदेशीर ठरू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याबरोबरच उत्पन्न वाढण्याचेही संकेत आहेत.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक बाबतीत यश देणारा ठरू शकतो. प्रेमसंबंधांतील अडचणी दूर होतील आणि नात्यात प्रेम व विश्वास वाढेल. रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार झाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना या काळात अनेक चांगले परिणाम मिळू शकतात. कोर्ट-कचेरीशी संबंधित अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल. केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. कामानिमित्त प्रवास घडू शकतो आणि तो भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल तसेच बचत करण्यातही यश मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)