Chandra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी किंवा नक्षत्रबदलाचा १२ राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारचे परिणाम मिळू शकतात. याच चंद्राचा शनीच्या मकर राशीतील प्रवेश ही एक महत्त्वपूर्ण ज्योतिषीय घटना आहे. चंद्राचे हे गोचर काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. चला पाहूया की, कोणत्या राशींच्या लोकांना याचा फायदा होईल ते…

वृषभ

मकर राशीतील चंद्राचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल राहील. बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतील. व्यावसायिकांना कामानिमित्त फायदेशीर प्रवास करावा लागू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

कन्या

मकर राशीचा स्वामी शनीचे कन्या राशीचा स्वामी बुधाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांची प्रतिष्ठा वाढेल आणि पदोन्नतीची शक्यता आहे. कला, माध्यम आणि लेखन क्षेत्रातील लोकांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्तम संधी मिळतील. अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असून, जुने वादही मिटेल.

वृश्चिक

हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सामर्थ्य, धैर्य आणि व्यवसायाच्या विस्ताराचा आहे. तुमची निर्णयक्षमता सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या धोरणांची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन प्रकल्पांचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. नवीन व्यावसायिक व्यवहार किंवा जुन्या ओळखींमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो. भागीदारीमध्ये नफा वाढेल आणि वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)