Chandra Gochar in Mesh Rashi 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
पंचांगानुसार, चंद्र २१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजून २७ मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत गोचर करेल. मेष ही राशीचक्राची पहिली रास असून चंद्राच्या या राशीतील प्रवेशाने पुन्हा एकदा नवीन राशीचक्र सुरू होईल. हिंदू नववर्षानंतर म्हणजेच गुढीपाडव्यानंतर चंद्राचे हे राशी परिवर्तन अत्यंत लाभदायक सिद्ध होईल.
चंद्राचे गोचर ‘या’ राशींचे नशीब चमकवणार
मकर (Makar Rashi)
मकर राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या लोकांसाठी चंद्राचे मेष राशीतील गोचर अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. कामात भरपूर यश मिळेल. सुख तुमच्या दाराशी नांदेल, करिअरमध्येही भरपूर प्रगती होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. प्रत्येक क्षेत्रात उत्तम यश मिळेल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा मेष राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
चंद्राचा मेष राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
