Chandra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
पंचांगानुसार, चंद्र २३ मार्च २०२६ रोजी पहाटे ०४ वाजून १३ मिनिटांनी वृषभ राशीत गोचर करणार असून शुक्राच्या राशीतील चंद्राच्या प्रवेशाने १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.
चंद्राच्या गोचराने ‘या’ राशींचे नशीब फळफळणार
वृषभ (Vrushabh Rashi)
चंद्राचा वृषभ राशीतील प्रवेश वृषभ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल.
तूळ (Tula Rashi)
चंद्राचा वृषभ राशीतील प्रवेश तूळ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
कर्क (Kark Rashi)
चंद्राचा वृषभ राशीतील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा वृषभ राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. चांगल्या कर्माचे फळ होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
