Neechbhanga Rajyog 2026 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २३ जुलै रोजी चंद्र तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दिसून येईल. चंद्राच्या या राशी बदलामुळे नीचभंग राजयोग निर्माण होईल. नीचभंग राजयोगाची निर्मिती काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या राशींना करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. या राजयोगाचा कोणत्या राशींवर चांगला परिणाम होईल जाणून घेऊ…

कर्क

चंद्र कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे नीचभंग राजयोगाची कर्क राशीसाठी शुभ ठरू शकतो. हा योग तुमच्या आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडून आणू शकतो. संपत्तीत वाढ होऊ शकतो, पण तणावातून दिलासा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकतात. घरात धार्मिक किंवा शुभ प्रसंग घडू शकतो. या राशीत जन्मलेल्यांना कुटुंबासह चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चंद्राचा नीचभंग राजयोग फलदायी ठरु शकतो. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तुम्हाला जीवनात अनेक आनंदाचे क्षण अनुभवता येतील. व्यावसायिकांना व्यवसाय विस्तार करता येईल. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळू शकतात. वैवाहिक जीवनही सुधारू शकते. तुमचा जोडीदार प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देईल, तुम्हाला मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)