scorecardresearch

२०२३ वर्षात होणार २ चंद्रग्रहण; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ तर ‘या’ राशींना होऊ शकतो शनिचा त्रास

Lunar Eclipse 2023 Effect on Zodiac Signs: २०२३ मध्ये २ चंद्रग्रहण होत आहेत. चला जाणून घेऊया १२ राशींवर याचा काय परिणाम होईल…

२०२३ वर्षात होणार २ चंद्रग्रहण; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ तर ‘या’ राशींना होऊ शकतो शनिचा त्रास

Chandra Grahan 2023 Dates and Time: २०२३ हे नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर येणारे वर्ष आपल्यासाठी कसे असेल याची अनेकांना नवीन वर्षाची उत्सुकता असते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून येणारा काळ खूप महत्वाचा असणार आहे. कारण या वर्षी शनी, गुरू या मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे या वर्षी २ चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण होतील. यासोबतच आम्ही तुम्हाला चंद्रग्रहण, कधी आणि किती वेळा होईल याबद्दल सांगणार आहोत. तसेच १२ राशींवर त्यांचा काय परिणाम होईल ते सुद्धा जाणून घेऊया..

चंद्रग्रहण कधी होते

ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य-पृथ्वी-चंद्र हे खगोलीय वर्तुळात एका सरळ रेषेत येतात. म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते, त्यानंतर चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते. चला जाणून घेऊया, २०२३ मध्ये चंद्रग्रहण कधी होईल…

पहिले चंद्रग्रहण (०५ मे २०२३)

आर्यभट्ट पंचांगनुसार, वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण शुक्रवार, ५ मे २०३३ रोजी होईल. हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार ०८:४४ पासून सुरू होणार तर शनिवार, ६ मे २०२३ रोजी मध्यरात्री ०१:०१ पर्यंत असेल. भारताव्यतिरिक्त हे ग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, आशिया खंडातील बहुतांश भाग, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि हिंदी महासागरात दिसणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ४ तास ८ मिनिटे असेल.

चला जाणून घेऊया १२ राशींवर काय परिणाम होईल..

मेष : भविष्याबद्दल थोडी काळजी वाटेल. तसेच कामात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.

वृषभ : जीवनसाथीसोबत मतभेद होऊ शकतात. योजनांमध्ये अडथळे येऊ शकतात.

मिथुन : हे ग्रहण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते.

कर्क : सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. परंतु वैयक्तिक आनंद आणि आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

सिंह : नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते परंतु पैशाचा खर्च अधिक होऊ शकतो. प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे.

कन्या : आत्मविश्वास वाढेल. तसेच, व्यवसायात लाभ संभवतो.

तूळ : तब्येत थोडी बिघडू शकते. पण कौटुंबिक त्रासातूनही सुटका मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : कोणत्याही विषयावर तणावाची परिस्थिती असू शकते. परंतु प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात.

( हे ही वाचा: २०२३ सुरू होताच ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? शिवयोग आणि सिद्ध योग घडल्याने मिळू शकतो प्रचंड पैसा)

धनु : काही शुभ माहिती मिळू शकते, नातेवाईकांशी संबंध चांगले राहण्याची शक्यता दिसत आहे.

मकर : करिअरमध्ये यश आणि आर्थिक स्थिती मजबूत असू शकते.

कुंभ : नोकरी-व्यवसायात धावपळ होण्याची परिस्थिती येऊ शकते. कठोर परिश्रमानेच प्रगतीची शक्यता दिसत आहे.

मीन : परदेश प्रवासाची शक्यता आहे. तसेच व्यवहार करताना काळजी घ्या.

दुसरे चंद्रग्रहण (२८ ऑक्टोबर २०२३)

२०२३ मधील दुसरे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच हे ग्रहण अश्विन पौर्णिमा, अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीला होणार आहे. भारतीय वेळेनुसार, ग्रहण शनिवारी मध्यरात्री २३:३२ वाजता सुरू होईल, तर दिवस रविवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ०३:५६ पर्यंत राहील. या ग्रहणाचा प्रभाव संपूर्ण भारतात दिसणार आहे.

त्याच वेळी, ते युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, उत्तर पूर्व अमेरिका यासह इतर अनेक देशांमध्ये पाहिले जाऊ शकते. या ग्रहणाचा कालावधी ३ तास ०७ मिनिटांचा असेल. या ग्रहणाचा सुतक काळ शनिवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ०८.०५ वाजता सुरू होईल आणि ग्रहणाचा मोक्ष दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.५६ वाजता होईल.

जाणून घ्या या ग्रहणाचा सर्व राशींवर काय परिणाम होईल..

मेष : मानसिक समस्या वाढण्याची आणि आरोग्या संबधित समस्या निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

वृषभ : कुटुंबात संकटाचे वातावरण असू शकते. तसेच धनहानी होऊ शकते.

मिथुन : पैसे मिळण्याची विशेष शक्यता आहे.

कर्क : वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सिंह : मुलाच्या बाजूने चिंता राहू शकते.

कन्या : अनेक प्रकारचे सुख मिळू शकते.

तूळ : जीवनसाथीसोबत मतभेद होऊ शकतात.

( हे ही वाचा: २०२३ सुरू होताच सिंह राशीचे नशीब पालटणार? शनिदेव ‘या’ रुपात देऊ शकतात प्रचंड धनलाभ)

वृश्चिक : काही आजार उद्भवू शकतात. खर्च होऊ शकतो.

धनु : अपमानाला सामोरे जावे लागू शकते. वाद होऊ शकतो.

मकर : भौतिक सुखाची प्राप्ती शक्य आहे.

कुंभ : व्यवसायात लाभ होऊ शकतो.

मीन : व्यवसाय मंद गतीने होऊ शकतो. धनहानी होऊ शकते.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 20:38 IST

संबंधित बातम्या