Chandra Grahan 2023 : 2023 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आणि पहिले सूर्यग्रहण आपण सर्वांनी पाहिले. आता येत्या काळात आणखी दोन ग्रहण दिसणार आहेत. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण २९ ऑक्टोबरला दिसणार आहे. या वर्षीच्या चार ग्रहणांपैकी हेच एक ग्रहण आहे जे या वर्षी भारतात दिसणार आहे.

चंद्रग्रहणाची वेळ

या वर्षीचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण २९ ऑक्टोबर म्हणजेच रविवारच्या दिवशी दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल, त्यामुळे सर्वांना या ग्रहणाची उत्सुकता आहे. भारतात हे चंद्रग्रहण मध्यरात्री १.०६ मिनिटांनी सुरू होणार असून २.२२ मिनिटांनी हे समाप्त होणार आहे.

Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
Average life expectancy of Indians
आनंदाची बातमी! भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात होतेय वाढ; जाणून घ्या कारणे…
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा

हेही वाचा : १८ महिने गुरु ग्रह ‘या’ राशींचे आयुष्य सोनपावलांनी बदलणार? कोणत्या टप्प्यावर सर्वाधिक धनलाभाची संधी, जाणून घ्या

सुतक काळ

१ तास १६ मिनिटे हे ग्रहण भारतात दिसणार आहे, मात्र याचा सुतक काळ हा ९ तासांपूर्वीच सुरू होणार. ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा प्रभाव बारा राशींवर पडणार आहे. या काळात कोणतेही शुभ किंवा नवीन काम करू नये आणि पूजा करू नये, असे म्हणतात.

हेही वाचा : बुधादित्य राजयोग बनून तीन दिवसांनी ‘या’ राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी? सूर्याचे तेज व अपार पैसा मिळू शकतो

चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय?

खगोलशास्त्रानुसार जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते त्या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. हे चंद्रग्रहण तीन प्रकारचे असते. खग्रास, खंडग्रास आणि उपछाया. जगभरातील लोक हे ग्रहण पाहण्यासाठी उत्सुक असतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)