Chandra Grahan 2026: हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार (आज) ०३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण दुपारी ०३ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहील. भारतामध्ये चंद्रोदय ०५ वाजून ५९ मिनिटांनी होईल. हे चंद्रग्रहण पूर्णपणे भारतात दिसणार नाही. कारण- ग्रहणाचा बराचसा भाग तेव्हा होईल, जेव्हा भारतात चंद्र उगवलेला नसेल. म्हणून भारतातील लोकांना या ग्रहणाचा फक्त शेवटचा टप्पा (अंतिम भाग) पाहता येईल. दरम्यान, या दिवशी काही महत्वपूर्ण ग्रहांचे गोचर देखील होईल. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल.

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो.

पंचांगानुसार, मंगळ ०३ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजून ०२ मिनिटांनी शतातरका नक्षत्रात प्रवेश करेल. शततारका हे नक्षत्र राहूचे असून मंगळाच्या या नक्षत्रातील प्रवेशाने नक्कीच त्याचा प्रभाव पाहायला मिळेल.

मंगळाचे नक्षत्र परिवर्तन आयुष्य बदलणार

वृश्चिक (Vruschik Rashi)

मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी भरपूर यश मिळेल.

मेष (Mesh Rashi)

मंगळाचे नक्षत्र परिवर्तन प्रवेश मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)