3 March Chandra Grahan Horoscope for 12 Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते. ३ मार्च २०२६ रोजी लागणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात ते संपत असताना, म्हणजेच मोक्ष काळात दिसणार आहे. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे ९ तास आधी सूतक काळ सुरू होतो आणि मोक्ष काळानंतर तो संपतो.
द्रिक पंचांगानुसार, चंद्रग्रहण दुपारी ०३:२० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ०६:४७ वाजता समाप्त होईल. त्यामुळे सकाळी ०६:२० वाजल्यापासून सूतक काळ सुरू होईल.
हे ग्रहण सूर्याच्या सिंह राशीत आणि शुक्राच्या पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात होत आहे. त्यामुळे याला ज्योतिषशास्त्रात खास महत्त्व मानले जाते. पंडित केपी शुक्ल यांच्या मते, या चंद्रग्रहणाचा परिणाम १२ राशींवर काही ना काही प्रकारे होऊ शकतो.
चला तर मग जाणून घेऊया मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींवर या चंद्रग्रहणाचा कसा परिणाम होईल…
मेष राशी चंद्रग्रहण (Aries Zodiac Chandra Grahan)
मेष राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या काळात जपून राहणे गरजेचे आहे. तुम्ही संयम ठेवून काम केले तर यश मिळू शकते. व्यवसायातही कोणतीही योजना आखताना नीट विचार करूनच निर्णय घ्या.
या राशीच्या पाचव्या भावात चंद्र असणार आहे. त्यामुळे मन, बुद्धी, मुलं आणि प्रेमसंबंध यावर जास्त परिणाम होऊ शकतो. या काळात मानसिक ताण जाणवू शकतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा, कारण निर्णय घेण्याची क्षमता थोडी कमी होऊ शकते.
लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येऊ शकतात. गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वाईट परिणाम टाळण्यासाठी ध्यान आणि मंत्रजप करणे फायदेशीर ठरेल.
वृषभ राशी चंद्रग्रहण (Taurus Zodiac Chandra Grahan)
वृषभ राशीच्या लोकांनी या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना नीट विचार करावा. असे केल्यास फायदा होईल. या राशीच्या चौथ्या भावात ग्रहण लागत आहे. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
वाहन चालवताना पूर्ण काळजी घ्या. घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहू शकते. म्हणून संयम आणि शांतपणे सर्व कामे करा. या काळात घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित मोठे निर्णय घेणे टाळावे. कोणत्याही वादापासून दूर राहणे चांगले. वाईट परिणाम टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर पांढऱ्या वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल.
मिथुन राशी चंद्रग्रहण (Gemini Zodiac Chandra Grahan)
मिथुन राशीच्या लोकांनी या काळात व्यापार, नोकरी आणि वैयक्तिक संबंधांमध्ये जास्त काळजी घ्यावी. या राशीच्या गोचर कुंडलीत ग्रहण तिसऱ्या भावात लागत आहे. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरावेत. लहान प्रवास करताना देखील सावध राहावे.
कर्क राशी चंद्रग्रहण (Cancer Zodiac Chandra Grahan)
कर्क राशीसाठी हे ग्रहण दुसऱ्या भावात होत आहे. हा भाव धन, कुटुंब आणि वाणीशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या राशीच्या लोकांना विनाकारण खर्चामुळे त्रास होऊ शकतो.
बोलताना विशेष काळजी घ्या. नकळत कठोर शब्द निघू शकतात आणि त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळावे. संयम आणि शांतता हीच या वेळची तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल.
सिंह राशी चंद्रग्रहण (Leo Zodiac Chandra Grahan)
या राशीच्या लग्न भावात ग्रहण लागणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सर्वात जास्त सावध राहणे गरजेचे आहे. मन अस्थिर राहू शकते. जुन्या गोष्टी आठवून मन विचलित होऊ शकते. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. राग आणि अहंकार यापासून दूर राहा. वाईट परिणाम कमी करण्यासाठी दररोज सूर्याला पाणी अर्पण करा.
कन्या राशी चंद्रग्रहण (Virgo Zodiac Chandra Grahan)
कन्या राशीत हे ग्रहण बाराव्या भावात लागत आहे. त्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि घाईत कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेऊ नका.
वाईट परिणाम टाळण्यासाठी “ॐ दुर्गाय नमः” या मंत्राचा जप करा. तसेच मूग डाळ किंवा इतर हिरव्या वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल.
तूळ राशी चंद्रग्रहण (Libra Zodiac Chandra Grahan)
या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अकराव्या भावात होत आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. मोठ्या फायद्याच्या लालसेपासून दूर राहा, नाहीतर पैशाचे नुकसान होऊ शकते.
रागात किंवा घाईत घेतलेले निर्णय टाळा, कारण त्यातूनही तोटा होऊ शकतो. वाईट परिणाम टाळण्यासाठी गायीला पीठ खाऊ घाला.
वृश्चिक राशी चंद्रग्रहण (Scorpio Zodiac Chandra Grahan)
या राशीच्या गोचर कुंडलीत हे ग्रहण दहाव्या भावात लागत आहे. त्यामुळे करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर जास्त परिणाम होऊ शकतो.
कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा निर्णय घाईत घेऊ नका. प्रत्येक निर्णय शांतपणे आणि संयमाने घ्या.
वाईट परिणाम टाळण्यासाठी मसूर डाळ आणि गुळाचे दान करणे फायदेशीर ठरेल.
धनु राशी चंद्रग्रहण (Sagittarius Zodiac Chandra Grahan)
या राशीत हे ग्रहण नवव्या भावात लागत आहे. त्यामुळे नशिबावर थोडा परिणाम होऊ शकतो. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण किंवा लांब प्रवासात अडचणी येऊ शकतात.
चांगल्या परिणामांसाठी हळदीची गाठ पिवळ्या दोऱ्यात बांधून नवीन कामांची सुरुवात करणे लाभदायक ठरेल.
मकर राशी चंद्रग्रहण (Capricorn Zodiac Chandra Grahan)
या राशीच्या लोकांनी पैशांशी संबंधित कामे करताना नीट विचार करूनच करावीत. या राशीत हे ग्रहण आठव्या भावात होत आहे. त्यामुळे अचानक घटना घडू शकतात. जुनी रहस्ये उघड होण्याची शक्यता आहे.
आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सावध राहा आणि वाहन चालवताना काळजी घ्या. शनीदेवाची पूजा करणे आणि मंत्रजप करणे लाभदायक ठरेल.
कुंभ राशी चंद्रग्रहण (Aquarius Zodiac Chandra Grahan)
या राशीच्या सप्तम भावात ग्रहण लागणार आहे. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज किंवा मतभेद होऊ शकतात. रागाच्या भरात ब्रेकअप करू नका किंवा नवीन वचन देऊ नका.
जीवनसाथी किंवा पार्टनरचे बोलणे शांतपणे, संयमाने ऐका. मित्र आणि कुटुंबीयांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. भविष्यासाठी योजना करताना नीट विचार करूनच निर्णय घ्या.
मीन राशी चंद्रग्रहण (Pisces Zodiac Chandra Grahan)
या राशीच्या गोचर कुंडलीतील सहाव्या भावात ग्रहण लागत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत पूर्णपणे सावध राहा.
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहा. आपल्या कामावर लक्ष द्या. कामात शिस्त आणि नियमितपणा ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक प्रगतीचे संकेत दिसत आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
