Chandra Grahan 28 August: २८ ऑगस्ट २०२६ रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण ३ राशींसाठी जड ठरू शकते. त्यामुळे या राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एखाद्या मोठ्या अडचणीत अडकण्याची शक्यता दिसत आहे. २८ ऑगस्टनंतर पुढील १५ दिवस या राशींच्या लोकांनी पैसा, आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीत अधिक सावध राहावे. चला जाणून घेऊया चंद्रग्रहणाची वेळ आणि त्याचा राशींवर होणारा नकारात्मक परिणाम.

ऑगस्ट महिन्यातील दुसरे चंद्रग्रहण २८ तारखेला लागणार आहे. ग्रहणाची सुरुवात सकाळी साधारण ०८:०४ वाजता होईल आणि समाप्ती सकाळी ११:२२ वाजता होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, पण त्याचा काही प्रमाणात राशींवर परिणाम होऊ शकतो. येथे आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशींसाठी हे ग्रहण अशुभ ठरू शकते.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण अशुभ ठरू शकते. आरोग्यात चढ-उतार जाणवू शकतात. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. व्यवसायात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणाशीही वाद किंवा भांडण टाळा. घरात तणावाचे वातावरण राहू शकते. ग्रहणाचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठीही वर्षातील दुसरे चंद्रग्रहण अशुभ ठरू शकते. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पैशांच्या व्यवहारात विशेष काळजी घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जवळच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. कार्यालयात तणावाचे वातावरण राहू शकते. शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण केल्यास ग्रहणाचा वाईट परिणाम कमी होऊ शकतो.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठीही वर्षातील दुसरे चंद्रग्रहण त्रासदायक ठरू शकते. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. सुरू असलेली कामे अडकू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. बुधवारी गरजू लोकांना दान केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)