Holi Purnima 2026: वर्षातील पहिले चंद्रग्रहण ०३ मार्च २०२६ रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होईल. हे ग्रहण भारतात दिसेल, शास्त्रांनुसार, चंद्रग्रहणासाठी सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या सुमारे नऊ तास आधी सुरू होतो. त्यामुळे, सुतक काळ ०३ मार्च २०२६ रोजी सकाळी सुरू होईल आणि संध्याकाळी ग्रहण संपल्यानंतरच प्रार्थना आणि शुभ विधी केले जातील. ज्योतिषशास्त्रानुसार, देखील हे ग्रहण अत्यंत लाभदायक मानले जात आहे. हे ग्रहण सिंह राशी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये लागणार असून या ग्रहणाचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर पाहायला मिळेल.

‘या’ राशींवर चंद्रग्रहणाचा पडणार शुभ प्रभाव

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. नोकरीत बढती मिळू शकते. तुम्हाला नवीन व्यवसायिक कल्पना सुचतील आणि प्रवासात फायदा होऊ शकतो. लेखनादी क्षेत्रात असणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून येऊ शकते. नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचा चांगला फायदा होईल. कर्जातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होऊन मालमत्ता, गुंतवणूक आणि नोकरीत अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी, व्यवसाय किंवा परदेशांत अभ्यासाची योजना आखत आहेत, त्यांना चांगले परिणाम अनुभवास येण्याची पूर्ण शक्यता आहे. नोकरदार लोकांची प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतात. व्यवसायात अनेक मोठ्या करारांना अंतिम स्वरूप मिळू शकते.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांना देखील चंद्रग्रहणाच्या शुभ प्रभावामुळे वडिलोपार्जित संपत्तीसंदर्भातील चांगली बातमी मीन राशीच्या लोकांना मिळू शकते. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. वेळेचा तुम्हाला योग्य प्रकारे वापर करावा लागेल. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)