Raksha Bandhan Chandra Grahan 2026: हिंदू धर्मात ग्रहण खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. ग्रहण काळात कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य केले जात नाही. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि अन्नपाणी ग्रहण करण्यास मनाई असते. हा काळ गर्भवती महिलांसाठी खूप महत्वाचा असतो. या काळात केवळ देवी-देवतांच्या मंत्रांचा जप करावा, असे मानले जाते. त्यामुळे ग्रहणाचे वाईट प्रभाव कमी होऊन, मानसिक शांती मिळते. दरम्यान, आता २०२६ मधील शेवटचे चंद्र ग्रहण रक्षाबंधनच्या दिवशी लागणार आहे. या ग्रहणाचा प्रभाव रक्षाबंधनाच्या सणावर कशाप्रकारे पडू शकतो. हे ग्रहण नक्की कधी व कुठे दिसणार आहे हे आपण जाणून घेऊ

२०२६ मध्ये कधी लागणार चंद्रग्रहण? (Chandra Grahan)

२०२६ या वर्षामध्ये दोन चंद्रग्रहण असतील. ज्यातील पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात लागले होते; तर दुसरे चंद्रग्रहण २८ ऑगस्ट रोजी लागेल. याच दिवशी रक्षाबंधन देखील असेल.

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कसे असेल?

२०२६ सालचे शेवटचे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण असेल. या काळात चंद्र लालसर दिसेल, ज्याला सामान्यतः ‘ब्लड मून’ म्हणून ओळखले जाते. काही क्षणांसाठी पृथ्वीची सावली चंद्राला पूर्णपणे झाकून टाकेल, ज्यामुळे तो लालसर दिसेल.

ऑगस्ट २०२६ चे चंद्रग्रहण कोठून दिसणार आहे?

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण प्रामुख्याने युरोप, अमेरिकेचा काही भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि आफ्रिका या प्रदेशांतून पाहता येईल.

चंद्रग्रहणाच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा करावा का?

२०२६ मधील दुसरे चंद्रग्रहण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच शुक्रवार,२८ ऑगस्ट २०२६ रोजी असेल. परंतु, हे ग्रहण भारतात न दिसता, ते जगातील इतर देशांमध्ये दिसेल. भारतात दिसत नसल्याने या ग्रहणाचा सूतक काळ भारतात लागू होणार नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय रक्षाबंधन साजरे करू शकता.

चंद्रग्रहण केव्हा होते?

वैज्ञानिकदृष्ट्या, चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्रग्रहणाची ही खगोलशास्त्रीय घटना धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक कुतूहल या दोन्हींना चालना देते.

ग्रहणानंतर काय करावे?

हिंदू धर्मात ग्रहणापूर्वी आणि नंतर काही विशेष कृती केल्या जातात. काही खबरदारी देखील घेतली जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे, दान करणे आणि पूजा करणे यामुळे आशीर्वाद मिळतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)