Chandra Grahan Time City Wise: आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे आणि ते भारतातही दिसणार आहे. त्यामुळे सूतक काळ मान्य केला जाईल. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही दृष्टीने या चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे.
खगोलशास्त्रानुसार, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि तिची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत जातो, तेव्हा तो लाल रंगाचा दिसतो. या अवस्थेला वैज्ञानिक भाषेत ‘ब्लड मून’ असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा राहू किंवा केतू चंद्राला ग्रासतात, तेव्हा ग्रहण लागते. या काळात चंद्राला त्रास होतो, असे मानले जाते.
भारतामध्ये संध्याकाळी हे चंद्रग्रहण स्पष्टपणे पाहता येऊ शकते. चला तर जाणून घेऊया, तुमच्या शहरात वर्षातील पहिले चंद्रग्रहण कोणत्या वेळी दिसेल. तसेच सुतक काळाची वेळ, त्याचे नियम आणि इतर महत्त्वाची माहितीही जाणून घेऊया.
आज चंद्रग्रहण कोणत्या वेळी लागणार? (Chandra Grahan Time Sutak Kaal)
वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल. हे ग्रहण सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील.
चंद्रोदय- सायंकाळी ६:२६ (शहरानुसार वेळ बदलू शकते)
उपच्छाया पहिला स्पर्श- दुपारी २:१६
प्रच्छाया पहिला स्पर्श- दुपारी ३:२१
खग्रास सुरू- सायंकाळी ४:३५
परमग्रास चंद्रग्रहण- सायंकाळी ५:०४
खग्रास समाप्त- सायंकाळी ५:३३
प्रच्छाया अंतिम स्पर्श- सायंकाळी ६:४६
उपच्छाया अंतिम स्पर्श- सायंकाळी ७:५२
चंद्रग्रहण २०२६ चा सूतक काळ (Chandra Grahan Sutak Kaal)
धर्मसिंधू, स्कंद पुराण आणि इतर धर्मग्रंथांनुसार, चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे ९ तास आधी सूतक काळ सुरू होतो. त्यामुळे आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून सूतक काळ सुरू झाला आहे. तो ग्रहणाच्या मोक्षकाळासोबत समाप्त होईल.
सुतक काळात करू नका ही कामे
गरुड पुराण आणि स्कंद पुराण यांनुसार, सूतक काळ सुरू झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत काही कामे करणे टाळावे असे सांगितले आहे.
यंदाचे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सूतक काळही लागू होईल. या काळात झोपणे, जेवण करणे, अन्न शिजवणे, कोणतेही शुभ काम करणे आणि देवी-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करणे टाळावे, असे मानले जाते.
भारतामध्ये चंद्रग्रहण किती वेळ दिसणार? (Chandra Grahan in India)
भारतामध्ये चंद्रोदय सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी होईल. त्यानंतरच चंद्रग्रहण पाहता येईल. मात्र काही ठिकाणी आकाश स्वच्छ असल्यास ग्रहण थोडे आधीपासूनही दिसू शकते.
या काळात चंद्र लाल रंगाचा दिसू शकतो. असे सुंदर दृश्य ईशान्य भारतात अधिक स्पष्टपणे पाहायला मिळेल. तर पश्चिम आणि दक्षिण भारतात ग्रहणाचा फक्त शेवटचा भागच दिसेल. त्यामुळे त्या भागात ‘ब्लड मून’ स्पष्टपणे दिसण्याची शक्यता कमी आहे.
पुणे, मुंबईसह राज्यातील ३५ जिल्ह्यातील चंद्रग्रहण किती वेळ असणार आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…
- अहिल्यानगर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.37 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- अकोला : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- अमरावती : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.24 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- छत्रपती संभाजीनगर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.34 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- बीड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- भंडारा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.16 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- बुलडाणा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- चंद्रपूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.18 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- धुळे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.36 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- गडचिरोली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.15 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- गोंदिया : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.13 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- हिंगोली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- जळगाव : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- जालना : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.32 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- कोल्हापूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.40 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- लातूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- मुंबई : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- नागपूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.18 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- नांदेड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.26 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- नंदुरबार : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.38 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- नाशिक : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- धाराशिव : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.32 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- पालघर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- परभणी : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.29 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- पुणे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- रायगड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- रत्नागिरी : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- सांगली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.39 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- सातारा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- सिंधुदुर्ग : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.43 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- सोलापूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- ठाणे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- वर्धा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.20 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- वाशिम : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- यवतमाळ : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.22 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
चंद्रग्रहणाच्या काळात करा ही कामे
शास्त्रांनुसार, सुतक काळ सुरू होताच घरातील देवघर लाल किंवा पिवळ्या कापडाने झाकणे शुभ मानले जाते.
या काळात दानधर्माला विशेष महत्त्व असते. अशी मान्यता आहे की ग्रहणानंतर तांदूळ, दूध, तूप, पांढरे कपडे आणि चांदी यांचे दान केल्यास चंद्रदोष शांत होतो आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात.
ग्रहणाच्या वेळी मंत्रजप करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. विशेषतः भगवान शिवांचा महामृत्युंजय मंत्र आणि चंद्र मंत्र “ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः” यांचा जप करणे लाभदायक मानले जाते.
याशिवाय, आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जपल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे आवश्यक आणि शुभ मानले जाते. यामुळे शरीरातील आणि वातावरणातील नकारात्मकता दूर होते. स्नान केल्यानंतर घरात आणि देवघरात गंगाजल शिंपडणेही लाभदायक मानले जाते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
