Chandra Grahan 2026 Marathi: फ्यूचर पंचांगानुसार उद्या म्हणजे ३ मार्च २०२६ रोजी यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही हे ग्रहण खूप महत्त्वाचे मानले जाते. हे ग्रहण सूर्याच्या अधिपत्याखालील सिंह राशीत होणार आहे.

हिंदू धर्मात चंद्रग्रहण ही एक विशेष घटना मानली जाते. अशी श्रद्धा आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ किंवा मांगलिक कार्य केले जात नाही. या काळात मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवले जातात. तसेच ग्रहणाचा वेळ गर्भवती महिलांसाठी विशेष संवेदनशील आणि काळजी घेण्याचा मानला जातो.

म्हणूनच ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून गर्भवती महिलांना सूर्यग्रहणाच्या वेळी काही खास नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो. चला, ते नियम कोणते आहेत ते जाणून घेऊया…

चंद्रग्रहणाची वेळ (Chandra Grahan Time in India)

फ्यूचर पंचांगानुसार ३ मार्च रोजी चंद्रग्रहण दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल. हे ग्रहण संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी संपेल. याचा सूतक काळ भारतातही लागू राहील.

गर्भवती महिलांनी या गोष्टींची घ्यावी काळजी (Chandra Grahan Pregnant Woman)

चंद्र ग्रहण 2026 सुतक काळ

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण सुरू होण्याच्या ९ तास आधी सूतक काळ सुरू होतो. त्यामुळे ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांपासून सूतक काळ सुरू होईल. हा काळ ग्रहण संपल्यावर समाप्त होईल.

घराबाहेर पडणे टाळा

पारंपरिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या वेळी बाहेर जाऊ नये. विशेषतः गर्भवती महिलांनी घरातच राहावे, असा सल्ला दिला जातो.

टोकदार वस्तूंचा वापर टाळा

ग्रहणाच्या वेळी कात्री, सुई किंवा सुरी यांसारख्या टोकदार वस्तूंचा वापर करू नये, असे मानले जाते. असे केल्यास पोटातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी श्रद्धा आहे.

सुतक काळाचे पालन

चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सूतक काळ सुरू होतो. या काळात पूजा करणे आणि स्वयंपाक करणे टाळण्याची परंपरा आहे. तसेच अन्नपदार्थांवर कुशा किंवा तुळशीची पाने ठेवावीत, असे मानले जाते.

गेरूचा लेप

जुन्या मान्यतेनुसार ग्रहणाच्या वेळी पोटावर गेरूचा लेप लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव गर्भावर होत नाही, असे मानले जाते.

मानसिक शांतता

या काळात आपल्या आवडत्या देवाचे मंत्रजप करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे फायदेशीर मानले जाते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)