chandra guru parivartan yog : ज्योतिषशास्त्रानुसार गुरू व चंद्र दोन्ही शुभ ग्रह आहेत. जेव्हा या दोघांमध्ये युती होते, तेव्हा काही राशींना शुभ फळे मिळू शकतात. अशीच एक शुभ युती १८ सप्टेंबरच्या रात्री होणार आहे. रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी चंद्र गुरूच्या राशीत, म्हणजेच धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर गुरू चंद्राच्या राशीत, म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. परिणामी, दोन्ही ग्रह एकमेकांच्या राशींमध्ये येतील आणि परिवर्तन योग निर्माण होईल. चला पाहूया की, या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो…

कर्क

चंद्र हा तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे गुरू आणि चंद्र यांच्यातील परिवर्तन योग तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत करू शकते. या काळात अपूर्ण कामे देखील पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आईकडील लोकांकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. कुंडलीतील पहिल्या घरात असलेला गुरु तुमचा आत्मविश्वास वाढवेल, ज्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुमच्या कामगिरीत सुधारणा होईल.

कन्या

तुमच्या राशीच्या कुंडलीत गुरु तुमच्या अकराव्या घरात, म्हणजेच लाभाच्या घरात असेल आणि चंद्र चौथ्या घरात, म्हणजेच आनंदाच्या घरात असेल. त्यामुळे, ही गुरु-चंद्र युती तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या व्यावसायिकांना चांगले सौदे मिळू शकतात, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात यशस्वीही होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात तुमच्या भावंडांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. तुमच्या आईच्या आरोग्यात सकारात्मक बदल होऊ शकतात.

धनु

गुरु तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि १८ सप्टेंबर रोजी चंद्रासोबत त्याची परिवर्तन युती जुळून येईल. या युतीमुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वागणुकीतही सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमच्या बोलण्याचा लोकांवर सामाजिक प्रभाव पडू शकतो. तुमची आर्थिक प्रगतीही होऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचीही शक्यता आहे.

मीन

राशीचक्रातील या युतीदरम्यान गुरू पाचव्या घरात आणि चंद्र दहाव्या घरात असेल. या युतीमुळे तुमच्या बौद्धिक क्षमता वाढू शकतात. तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल. तुमच्या थांबलेल्या कामालाही गती मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगार लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी रोजगार मिळू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)