Mangal Gochar 2026 : ग्रहांचा अधिपती असलेला मंगळ ग्रह सध्या चंद्राच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत आहे. तो १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत तिथेच राहील. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ व चंद्र या दोघांचे स्वरूप आणि प्रभाव भिन्न मानले जातात. मंगळ ऊर्जा, धैर्य, क्रोध आणि निर्भयतेचे प्रतीक आहे, तर चंद्र मन, शांतता आणि स्थिरतेचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे, या दोन ग्रहांच्या या अनोख्या संयोगामुळे काही राशींसाठी चढ-उतार येऊ शकतात. या काळात त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि घाईने घेतलेल्या निर्णयामुळे समस्या वाढू शकतात. ज्योतिषांच्या मते, याचा त्यांच्या कामावर आणि वैयक्तिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, काही राशींना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मेष

तुम्हाला या काळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणावर तरी जास्त विश्वास ठेवल्याने तुमच्या अडचणी वाढू शकतात, त्यामुळे कामाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी कोणतेही घाईचे निर्णय घेणे टाळा आणि तुमची महत्त्वाची कामे विचारपूर्वक पूर्ण करा. या काळात कामाच्या ठिकाणी शॉर्टकट घेणे किंवा नियम मोडणे टाळा. कारण यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. तुमच्या वैवाहिक मार्गात अडथळे येतील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी, त्याचे फायदे आणि तोटे काळजीपूर्वक विचारात घ्या. या काळात काही अडचणींमुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचारही करू शकता.

कर्क

या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याच्या किंवा महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या दीर्घकालीन योजनांमध्ये अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत स्पर्धा वाढू शकते. आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या आणि अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. या काळात आर्थिक बाबींमध्ये घाई करणे हानिकारक ठरू शकते. क्षुल्लक गोष्टींवरून प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.

कन्या

तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसते आहे. पण, खर्चही वाढू शकतो. त्यामुळे, संतुलित आर्थिक परिस्थिती राखण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. न्यायालयीन कामांमुळे तुम्हाला थोडी जास्त धावपळ करावी लागू शकते. कोणत्याही गोष्टीत घाई करणे टाळा. कारण – घाईने घेतलेल्या निर्णयामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. सोपा मार्ग स्वीकारण्याऐवजी, आपल्या मेहनतीवर आणि गतीवर लक्ष केंद्रित करा आणि नियोजित पद्धतीने पुढे जा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)