Chandra Mangal Yog 2026: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात काही राशींसाठी महत्त्वाची ठरू शकते. १ नोव्हेंबर २०२६ रोजी चंद्र आणि मंगळ कर्क राशीत एकत्र येणार आहेत. ज्योतिषशास्त्रात चंद्र-मंगळाच्या या युतीला ‘चंद्र-मंगळ योग’ म्हटले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, याला ‘महालक्ष्मी योग’ असेही म्हटले जाते. पंचांगानुसार या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल, तर मंगळही कर्क राशीत असल्याचे ग्रहस्थितीमध्ये नमूद आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मन, भावना आणि मानसिक स्थितीचा, तर मंगळ हा ऊर्जा, धाडस, पराक्रम आणि कृतीचा कारक मानला जातो. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती झाल्यावर निर्णयक्षमता, मेहनत आणि आर्थिक बाबतीत सक्रियता वाढू शकते. ही युती ३ नोव्हेंबरच्या पहाटे ३.४६ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. मात्र या योगाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार वेगळा असू शकतो. तर मग जाणून घेऊया कोणत्या ४ राशींसाठी हा काळ विशेष मानला जातो…
मेष राशी: करिअरमध्ये बदलाची संधी, गुंतवणुकीत फायदा?
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअर आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचा ठरू शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी, पदातील बदल किंवा नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
व्यवसाय करणाऱ्यांना नवीन लोकांशी संपर्क वाढवण्याचा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत मानले जात असले तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना घाई न करता सर्व बाजू तपासणे फायदेशीर ठरेल.
कर्क राशी: रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता
कर्क राशीसाठी ही युती विशेष महत्त्वाची मानली जात आहे, कारण चंद्र आणि मंगळ दोन्ही कर्क राशीत असतील. त्यामुळे करिअर आणि आर्थिक क्षेत्रात काही बदल जाणवू शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायिकांना नवीन प्रोजेक्ट, ग्राहक किंवा कामाच्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासोबतच रखडलेले पैसे किंवा जुनी येणी मिळण्याची शक्यता आहे.
तूळ राशी: उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात
तूळ राशीसाठी चंद्र-मंगळ योग करिअरच्या दृष्टीने संधी घेऊन येऊ शकतो, असे ज्योतिषीय मत आहे. पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. व्यवसाय करणाऱ्यांना एखाद्या जुन्या व्यावसायिक संपर्काचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून रखडलेले आर्थिक व्यवहार किंवा कामे पुढे सरकू शकतात.
वृश्चिक राशी: मेहनतीचे फळ आणि अचानक आर्थिक लाभ?
वृश्चिक राशीसाठीही हा ग्रहयोग आर्थिक बाबतीत महत्त्वाचा मानला जात आहे. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नवीन जबाबदारी किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाची संधी मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेतही काही ज्योतिषीय गणनांमध्ये दिले आहेत. मात्र मोठी आर्थिक गुंतवणूक किंवा निर्णय घेताना भावनेच्या भरात पाऊल न उचलता योग्य विचार करणे महत्त्वाचे राहील.
