Chandra Mangal Yuti On Rakshabandhan : आज २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाबरोबर चंद्र व मंगळ यांच्यात नवपंचम योग देखील तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम योग हा एक शुभ योग मानला जातो. त्यामुळे या शुभ दिवशी, नवपंचम योगामुळे काही राशींना जीवनात शुभ फळे मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला या राशींबद्दल माहिती देणार आहोत.

मेष

चंद्र व मंगळ यांच्यातील नवपंचम योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. उद्या चंद्र तुमच्या लाभ घरात आणि मंगळ तुमच्या शौर्याच्या घरात असेल. या नवपंचम योगामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही जणांना कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायातही अनुकूल बदल अनुभवता येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वासही वाढेल, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा भेटू शकतात.

वृश्चिक

चंद्र व मंगळाची नवपंचम युती तुम्हाला आर्थिक चालना देऊ शकते. काहींना पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. इतर ठिकाणच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनाही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातही आनंद मिळू शकतो, तर काही जणांना चांगली बातमी मिळू शकते. नशीबही तुम्हाला साथ देण्याची शक्यता आहे.

धनु

चंद्र व मंगळाची नवपंचम युती इच्छापूर्ती करणारी ठरू शकते. ही युती कायदेशीर बाबींमध्ये यश मिळवून देऊ शकते. व्यावसायिकांना एका चांगल्या व्यवहारातून आर्थिक फायदा होऊ शकतो. काही नोकरदार व्यक्तींच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असणाऱ्यांना एक चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)