Chandra Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.

पंचांगानुसार, चंद्र ०२ मार्च २०२६ रोजी सकाळी ०७ वाजून ५१ मिनिटांनी अश्लेषा नक्षत्रातून मघा नक्षत्रात प्रवेश करेल. मघा नक्षत्राचा स्वामी केतू असून चंद्राचे केतूच्या नक्षत्रातील गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक सिद्ध होईल. शिवाय चंद्राचे हे गोचर होळी पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

चंद्राचे नक्षत्र राशी परिवर्तन ‘या’ राशींचे भाग्य उजळवणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे नक्षत्र राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल.

कर्क (Kark Rashi)

चंद्राचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या लोकांसाठी चंद्राचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)