Mercury Transit 2026: हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार (आज) ०३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण दुपारी ०३ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहील. भारतामध्ये चंद्रोदय ०५ वाजून ५९ मिनिटांनी होईल. हे चंद्रग्रहण पूर्णपणे भारतात दिसणार नाही. कारण- ग्रहणाचा बराचसा भाग तेव्हा होईल, जेव्हा भारतात चंद्र उगवलेला नसेल. म्हणून भारतातील लोकांना या ग्रहणाचा फक्त शेवटचा टप्पा (अंतिम भाग) पाहता येईल. दरम्यान, या दिवशी काही महत्वपूर्ण ग्रहांचे गोचर देखील होईल. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल.

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. पंचांगानुसार, चंद्र ०३ मार्च २०२६ रोजी रात्री ०७ वाजून ३१ मिनिटांनी पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये गोचर करेल. हे गोचर १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात चंद्रग्रहण नुकतेच समाप्त होईल. त्यामुळे याचा प्रभाव अधिक पटीने वाढेल.

‘या’ चार राशींना चंद्र देणार सुख-समृद्धी

मेष (Mesh Rashi)

चंद्राचे नक्षत्र पद परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना चंद्राचे नक्षत्र पद परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

मीन (Meen Rashi)

चंद्राचे नक्षत्र परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)