Chandra Rashi and Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. पंचांगानुसार, चंद्र २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री ०३ वाजून ५२ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार असून याच दिवशी दुपारी ०३ वाजून ०६ मिनिटांनी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. कर्क ही चंद्राची स्वराशी असून रोहिणी नक्षत्राचा स्वामी ग्रह देखील चंद्र आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्राचे स्वतःच्या राशी आणि नक्षत्रातील हे गोचर नक्कीच १२ पैकी काही जणांसाठी लाभदायक सिद्ध होईल.
चंद्राचे गोचर आयुष्य बदलणार ‘या’ राशी मालामाल होणार
कर्क (Kark Rashi)
चंद्राचा स्वराशी आणि नक्षत्रातील गोचर राशीतील गोचर कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आरोग्य चांगले राहील. आईबरोबरचे नातेसंबंध अधिक मजबूत होईल, बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या लोकांना चंद्राचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल. स्पर्धा परिक्षेत उत्तम यश मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
मीन (Meen Rashi)
चंद्राचे राशी आणि नक्षत्र गोचर मीन राशीसाठी खूपच अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

