Chandra Rashi Gochar 2026: अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा, १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल. या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येते. हिंदू पंचागांनुसार, अक्षय्य तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या वर्षी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. तसेच हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही खूप खास मानला जातो. या दिवशी चंद्राचे गोचर होणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर नक्कीच पाहायला मिळेल.
पंचांगानुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी चंद्र मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांनी शुक्राच्या वृषभ राशीत गोचर करणार असून चंद्राचे हे गोचर काही राशींसाठी भाग्यदायी ठरू शकते.
अक्षय्य तृतीयेला चंद्राचे गोचर ‘या’ राशींचे नशीब चमकवणार
कर्क (Kark Rashi)
अक्षय्य तृतीयेचा दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल.आर्थिक स्थिती मजबूत राहील. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
वृषभ (Vrushabh Rashi)
अक्षय्य तृतीयेचा दिवस वृषभ राशींच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घेऊन येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. धार्मिक स्थानांना भेट द्याल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस लाभदायी ठरेल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीची योजना आखू शकता. नोकरी करणाऱ्यांना मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. प्रलंबित सरकारी कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करार देखील करू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
