Guru-Budh Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. सध्या देवगुरु मेष राशीत विराजमान आहेत. तर बुधदेव मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मेष राशीत गोचर करणार आहेत. त्यामुळे मेष राशीत बुधदेव आणि देवगुरुची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये, बुध आणि गुरुच्या युतीला अत्यंत शुभ मानले जाते. बुधला तर्कचा कारक ग्रह मानला जातो तर गुरुला ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो. बुध व गुरूच्या युतीने काही राशींचे नशीब चमकण्याची शक्यता असून त्यांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, ‘या’ भाग्यशाली राशी..
‘या’ राशींना प्रचंड धनलाभ?
कर्क राशी
बुध व गुरुची युती ही कर्क राशीसाठी लाभदायक व शुभ सिद्ध होऊ शकते. येत्या दिवसात आपल्या नोकरीत पगारवाढ व पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतात. तुमचे आर्थिक पाठबळ वाढवणाऱ्या काही घटना घडू शकतात. या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. तुमचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. मुलाशी संबंधित आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते.
(हे ही वाचा: ५० वर्षांनी मकर राशीत ‘त्रिग्रही योग’ बनल्याने फेब्रुवारीपासून ‘या’ राशींना प्रचंड धनलाभ? अपार श्रीमंती कोणाच्या नशिबात?)
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध व गुरुची युती सकारात्मक बदल घेऊन येणारी ठरु शकते. व्यवसाय आणि नोकरदार वर्गासाठी हा सर्वात उत्तम काळ ठरु शकते. परदेशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रवासातून नवीन संधी आणि नवीन ओळखी ही भविष्यात खूप जास्त फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसेही तुमच्याकडे परत येऊ शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
धनु राशी
धनु राशींच्या लोकांसाठी बुध आणि गुरुची युती अपार धनलाभ घेऊन येणारी ठरु शकते. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. या काळात पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुम्हाला पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठू शकता. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. जमीन आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. कुटुंबात आनंद आणि सुख लाभू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
