Conjunction Of Saturn And Venus 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशिबदल करतात. त्यांच्या अनुकूल आणि शत्रू ग्रहांशी संयोग करतात; ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यात शनी ग्रह सध्या त्याच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत भ्रमण करीत आहे; तर डिसेंबरमध्ये शुक्र कुंभ राशीत प्रवेश करील. अशा स्थितीत कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग होईल. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळू शकते आणि त्यांची करिअर व व्यवसायात प्रगती होऊ शकते. त्यामुळे शुक्र-शनी संयोग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी भाग्यशाली ठरू शकतो ते आपण जाणून घेऊ…
कुंभ
शुक्र आणि शनीचा संयोग कुंभ रास असलेल्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकतो. या संयोगामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमच्या संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल आणि कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरीही सुधारेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील. यावेळी अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच या काळात तुम्ही मोठ्या लोकांशी संबंध वाढवू शकता.
वृषभ
शुक्र आणि शनीची युती वृषभ राशी असलेल्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांवर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल आणि कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरीही सुधारेल. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. नवीन ऑर्डर मिळू शकतात.
मिथुन
शनी आणि शुक्र यांचा संयोग मिथुन राशी असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचेही कौतुक होईल. धर्म, कार्य व अध्यात्मात रुची वाढू शकते. या काळात तुम्हाला देश-विदेशांत प्रवास करण्याची संधी मिळू शकते. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोतदेखील सापडू शकतात आणि तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यात यश मिळण्याची अपेक्षा आहे.