Shukra Shani Yuti: नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२४ मध्ये अनेक ग्रह एकमेकांशी युती करुन शुभ राजयोग तयार करणार आहेत. ज्यात शनि आणि शुक्रदेवाचाही समावेश आहे. शनिदेव कुंभ राशीत भ्रमण करत आहेत. तर २०२४ च्या सुरुवातीला शुक्रदेव कुंभ राशीत गोचर करणार आहेत. ज्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती कुंभ राशीत होणार आहे. ही युती तब्बल ३० वर्षांनी होणार असल्याने काही राशींना नवीन वर्षात सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

२०२४ मध्ये ‘या’ राशींचे अच्छे दिन?

मेष राशी

शनि आणि शुक्रदेवाची युती मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. नवीन वर्षात तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळू शकतं. या काळात तुमचा पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स झपाट्याने वाढू शकतं. तुम्ही घर, वाहन, जमीन इत्यादी खरेदी करु शकता. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी चांगल्या जोडीदाराचा प्रस्ताव येऊ शकतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

(हे ही वाचा: येत्या ५ दिवसात ‘या’ ३ राशींना मिळेल प्रचंड धनलाभाची संधी? ‘चंद्र-मंगळ योग’ बनल्याने मिळू शकतात आनंदाच्या बातम्या )

वृषभ राशी

शनि आणि शुक्रदेवाची युती वृषभ राशींच्या लोकांसाठी लाभकारी ठरु शकते. या काळात रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली होऊ शकते. आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच सन्मानही मिळू शकतो. नोकरीत पद वाढू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.

मकर राशी

मकर राशींच्या लोकांना शनि आणि शुक्रदेवाच्या युतीने नवीन वर्षात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात शुभ परिणाम मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी यश मिळू शकतो. आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊन उत्पन्नात अनपेक्षित वाढ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader