आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २१ मे २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:- रेस जुगारातून लाभ संभवतो. शक्यतो प्रवास टाळावा. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी केल्या जातील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
वृषभ:- आपला नावलौकिक लक्षात घेऊन वागावे. काहीसा मानसिक ताण संभवतो. दिवसभर कामाचा व्याप राहील. स्वत:चेच म्हणणे खरे करायला जाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल.
मिथुन:- प्रवासात काहीसा त्रास संभवतो. तुमच्या मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास दोन पावले मागे यावे. स्त्री सौख्याचा लाभ होईल. आपले मत योग्य प्रकारे मांडा.
कर्क:- आवडते पदार्थ खायला मिळतील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घराबाहेर वावरतांना सतर्क रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
सिंह:- तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. पत्नीशी वादाचे प्रसंग येवू शकतात. हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पूर्ण करून घ्याल. विरोधकांचा विरोध मावळेल.
कन्या:- कामाचे योग्य नियोजन करावे. दिरंगाईवर मात करावी लागेल. वरिष्ठांचा आदेश वेळेवर पूर्ण करा. मानसिक स्थैर्य जपावे. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
तूळ:- मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. वेळ आणि काम यांची सांगड घाला. मुलांचे वागणे स्वातंत्र्यप्रिय राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.
वृश्चिक:- तुमचे श्रम वाढू शकतात. पत्नीशी मतभेदाची शक्यता आहे. जुनी प्रकरणे सामोरी येवू शकतात. व्यावसायिक स्थैर्य लाभेल. प्रवासात सावधानता बाळगावी.
धनू:- कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. संसर्गजन्य विकारांपासून जपावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. उपासनेला वेळ मिळेल. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ मिळेल.
मकर:- योग्य वेळी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे कमी श्रमात पार पडतील. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. नैराश्याला बळी पडू नका. बोलतांना इतरांचे मन दुखवू नका.
कुंभ:- भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवाल. चैनीच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.
मीन:- इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daily astrology horoscope friday 21 may msr

Next Story
आजचे राशीभविष्य, सोमवार, ५ डिसेंबर २०१६Astrology, horoscope, आजचे राशीभविष्य
ताज्या बातम्या