scorecardresearch

Premium

Daily Horoscope: आठवड्याच्या शेवटी ‘या’ राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार, पाहा तुमचे भविष्य

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

Today Horoscope in marathi
आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२३ (Photo – Freepik)

Daily Rashibhavishya in Marathi, 10 December 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
Rajyog In Kundli
२०० वर्षांनी शशसह ३ राजयोग जुळून आल्याने मार्चमध्ये ‘या’ राशींचे गरिबीचे दिवस संपणार? शनिच्या कृपेने हातात येऊ शकतो पैसा
Surya Mangal yuti
१० वर्षांनी ‘आदित्य मंगल’ योग बनल्याने ‘या’ राशी होतील लखपती? सूर्य-मंगळाच्या युतीने तुम्हीही होऊ शकता मालामाल

वृषभ:-

आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन:-

उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याचा उपयोग होईल.

कर्क:-

जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.

सिंह:-

अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.

कन्या:-

काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते.

तूळ:-

अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

वृश्चिक:-

क्रोधवृत्तीला आवर घाला. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका.

धनू:-

पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

मकर:-

कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. वडीलांचे सहकार्य मिळेल.

कुंभ:-

जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.

मीन:-

काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope 10 december daily astrology rashi bhavishya in marathi jap

First published on: 09-12-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×