Rashi Bhavishya11 March 2026 In Marathi : आज ११ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी रात्री ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर वज्र योग जुळून येईल आणि ज्येष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. जेष्ठा नक्षत्रात तुमचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ११ मार्च २०२६ (Dainik Rashi Bhavishya 11 March 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

वागण्या-बोलण्यात काहीसा हटवादीपणा येईल. कामात गतीमानता येईल. स्वत:बद्दलच्या नसत्या कल्पना बाजूला साराव्यात. बुद्धिचातुर्याने कामे कराल. परिस्थितीनुरूप वागणे ठेवाल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

वागण्यात कर्मठपणा आणाल. वडीलांचा मान ठेवून निर्णय घ्यावा. प्रगल्भतेने वागणे ठेवाल. न्यायी वृत्तीने मत मांडाल. नवीन विचार आत्मसात करावेत.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. अति विचार करू नका. अचानक धनलाभ संभवतो. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

शांत व संयमी विचार कराल. वैचारिक आधुनिकता ठेवावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. भावंडांना मदत कराल. घराची सजावट कराल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

चुकीच्या लोकांमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. परिस्थिती जाणून योग्य मार्ग काढावा. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. वाताचे विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढवू नका.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

मनातील नसते संशय काढून टाकावेत. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करावा. दीर्घकाळ चिकाटीने कामे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

घरगुती कामात अधिक कष्ट पडू शकतात. आपल्या गृहसौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील कामात यश येईल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. प्रवासात वाहन जपून चालवावे.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

काही गोष्टींचा अधिक खोलवर विचार करावा. धैर्याने कामे हाती घ्याल. व्यवसायात चांगली आर्थिक कमाई होईल. हातात काही नवीन अधिकार येतील. कौटुंबिक खर्चाचा ताण राहील.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

काही बदल जाणीवपूर्वक करावेत. नसत्या वादात अडकू नका. निराशेच्या आहारी जाऊ नये. घराची कामे सुरळीत पार पडतील. स्वबळावर कामे उरकाल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

जुन्या गोष्टींचा आधार घेणे टाळावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करावे लागतील. छुप्या शत्रूंची डोकेदुखी वाढेल. हातातील अधिकार वापरावेत.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

उगाचच कोणाशीही वैर पत्करू नका. काही कारणाने घरापासून दिवसभर दूर राहावे लागेल. गप्पांची मैफल जमवाल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

कामाचा योग्य आढावा घ्यावा. मानसिक ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मानापमान फार मनावर घेऊ नका. आपले स्वत्व गुण राखून वागाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर