Rashi Bhavishya 12 July 2026 In Marathi : आज १२ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील त्रयोदशी तिथी असणार आहे. आज रोहिणी नक्षत्र जुळून येईल, त्याचबरोबर वृद्धी योग जुळून येत आहेत. राहू काळ ५ वाजून २४ मिनिटांनी सुरु होईल ते ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त ११ वाजून ५८ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे. सूर्यदेव तुमच्या कुंडलीत कसं देणार सुख? वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १२ जुलै २०२६ (Dainik Rashi Bhavishya 12 July 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

सेवाभावी वृत्तीने कामे करावीत. मात्र व्यवहारी दृष्टीकोन बाजूला सारून चालणार नाही. मनमोकळे विचार करावेत. उगाचच बंधनात अडकून राहू नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

आर्थिक प्रश्न मिटतील. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. जवळच्या प्रवासाचा योग संभवतो. श्वसनाच्या विकारांपासून जपावे.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

एकसूत्री विचार करावा. धरसोडपणे कामे करू नयेत. कामातील बदलांकडे विशेष लक्ष ठेवा. क्षणभराच्या आनंदाने हुरळून जाऊ नका. मानसिक शांततेला प्राधान्य द्यावे.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. फसव्या लोकांपासून सावध राहावे. अति विचाराने थकवा जाणवेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

तडजोडीला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. विचारांची दिशा बदलावी लागेल. तरुणांचे विचार जाणून घ्यावेत. नवीन ओळखी होतील.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

चिंतामुक्त जगावे. पत्नीच्या विचारांशी तडजोड करावी लागेल. अधिकारी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. मनातील कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

दिवसभर कामात गुंग राहाल. आजचा दिवस लाभदायक असेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक कारणावरून चिडचिड संभवते. शेअर्स च्या कामात यश मिळेल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी. घेतलेल्या मदतीची जाणीव ठेवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

जोडीदाराशी अनबन होऊ शकते. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. अचानक धनलाभाची शक्यता. घरातील कुरबुरी शांततेने हाताळा. जमिनीच्या कामात यश येईल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अधिकाराचा योग्य वापर करावा. काही धाडसी निर्णय घ्याल. मनातील मरगळ काढून टाकता येईल. करमणुकीत वेळ घालवावा.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल. घरातील स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल. आवडी-निवडी बाबत अधिक काटेकोर राहाल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

मुलांबरोबर वेळ व्यतीत कराल. मित्रांची वेळेवर मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. तांत्रिक गोष्टीत रस घ्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर