scorecardresearch

Premium

Daily Horoscope: राजकीय संपर्कातून ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार लाभ, पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.

Daily Horoscoper 14 September 2023
आजचे राशीभविष्य, १४ सप्टेंबर २०२३ (फोटो- Freepik)

दैनिक राशिभविष्य: 14 September 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

वृषभ:-

बोलण्यातील कटुता टाळा. जुन्या पुस्तकांचे वाचन कराल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे.

मिथुन:-

बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडाल. सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळाव्यात. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

कर्क:-

उत्तम वाहन सौख्य लाभेल. शांत विचाराने कामे पूर्ण करा. मुलांप्रतीच्या जबाबदार्‍या पार पाडाल. कामा निमित्त छोटे प्रवास घडतील. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

सिंह:-

आपल्या निर्णयावर ठाम राहाल. नम्रपणे बोलून आपला मान राखाल. राजकीय संपर्कातून लाभ होईल. जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. धाकट्या भावंडाचे सहकार्य लाभेल.

कन्या:-

कामाचा ताण वाढता राहील. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या शोधात असणार्‍यांना दिलासादायक दिवस. व्यावसायिकांना संपर्कातून लाभ होईल. उत्तम स्त्री सौख्य लाभेल.

तूळ:-

आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जवळचा प्रवास घडेल. हसत खेळत वागणे ठेवाल. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक:-

नातेवाईकांना नाराज करू नका. दिवस माध्यम फलदायी असेल. आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी. बोलण्यात माधुर्य ठेवल्यास कामे सुरळीत पार पडतील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे.

धनू:-

नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. विरोधक नरमाईची भूमिका घेतील. नवीन व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील. सासरच्या मंडळींकडून लाभ होतील.

मकर:-

समोरच्या व्यक्तीची साशंकता दूर कराल. आहाराची पथ्ये पाळावीत. धार्मिक बाजू भक्कम कराल. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील.

कुंभ:-

नवीन ओळखी वाढवाव्यात. भागीदारीतील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या. मनातील इच्छा पूर्ण होतील. संयमाने कार्यरत राहाल. अचानक प्रवास संभवतो.

मीन:-

जुनी व्यावसायिक कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्च दूर ठेवा. मुलांच्या जबाबदार्‍या पार पडण्यात दिवस निघून जातील. काही कुरबुरी चर्चेतून दूर कराव्यात. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-09-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×