Horoscope Today 18 July 2026 In Marathi : आज १८ जुलै २०२६ रोजी कृष्ण पक्षातील आषाढ महिन्यातील पंचमी तिथी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी सुरु होणार आहे. आज पूर्वाफाल्गुनी नक्षत्र जागृत असेल आणि त्याचबरोबर वरियन योग जुळून येत आहेत. राहू काळ १० वाजून ४४ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त ११ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. शनिदेव तुमच्या पाठीशी आज कसे उभे राहणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, १८ जुलै २०२६ (Today Horoscope 18 July 2026 In Marathi)
आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
भागिदारीतून अपेक्षित लाभ होईल. थोडीफार खरेदी केली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.
आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
कलहकारक वातावरण टाळावे. गरजेच्या वस्तु खरेदी केल्या जातील. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल.
आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
ठामपणे निर्णय घ्यावे लागतील. भावनिक ताण कमी करावा. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. आपल्याच मतावर अडून राहू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराचे मत विचारात घ्या. गनीमी काव्याचा वापर कराल. हट्टीपणे वागाल. संयमाने काम साधावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवावी लागेल.
आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
सकारात्मकता कमी पडू देऊ नका. तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. मनावरील चिंतेचे मळभ दूर होईल. मुलांवरील विश्वास घट्ट होईल. उत्साहाने कामे तडीस न्याल.
आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. तडजोडीला पर्याय नाही. संयम सोडून चालणार नाही. कौटुंबिक कामात लक्ष घालावे लागेल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.
आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
मनात विशिष्ट हेतु घेऊन काम कराल. दिवस धावपळीत जाईल. हातातील कामात यश येईल. आपल्या आवडत्या गोष्टीत रमून जाल. ऊर्जा आणि उत्साह वाढेल.
आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
उत्तराला प्रत्युत्तर द्याल. हमालीची कामे करणे टाळावे लागेल. कर्जाची प्रकरणे हातावेगळी करावीत. शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. बौद्धिक दिमाख दाखवाल.
आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
माणसामाणसातील फरक ओळखावा. दिवस कामाने व्यापलेला राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जुन्या गोष्टींनी त्रस्त होऊ नका.
आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
कामाची रूपरेखा ठरवा. स्वावलंबन असणे आवश्यक आहे. दान-धर्म करण्याचा विचार कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तुमच्या ज्ञानात भर पडेल.
आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा. विशाल दृष्टीकोन बाळगाल. नवीन मित्र जोडावेत. व्यावसायिक गोष्टीवर अधिक भर द्याल.
आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
वाढीव कामे मागे लागू शकतात. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी. जबाबदारी टाळून चालणार नाही. आततायीपणा आड येऊ देऊ नका.
