scorecardresearch

Premium

Daily Rashi Bhavishya : ‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात चांगली संधी प्राप्त होणार, पाहा तुमचे भविष्य

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरु शकतो.

Today Horoscope in marathi
आजचे राशीभविष्य, १८ नोव्हेंबर २०२३ (Photo – Freepik)

Daily Rashibhavishya in Marathi, 18 November  2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. परिचितांना मदत कराल.

Daily HHoroscope 9 october 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 7 october 2023
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या कामातून होणार फायदा, पाहा १२ राशींचे भविष्य
Daily Horoscope 27 September 2023
Daily Horoscope: मिथुनला आनंदवार्ता मिळणार तर ‘या’ राशीच्या व्यक्तींना जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभणार, पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscope 23 September 2023
Daily Horoscope: वृषभसाठी दिवस फलदायी तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक ताणतणाव टाळावेत, पाहा तुमचे भविष्य

वृषभ:-

धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. व्यावसायिक उन्नती साधता येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. नवीन लोक संपर्कात येतील.

मिथुन:-

ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. बुद्धी चातुर्याचा वापर कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल.

कर्क:-

व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. विलंबित गोष्टी मार्गी लागतील. दिवस माध्यम फलदायी असेल. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. भावनांना आवर घालावा.

सिंह:-

आपली मनोकामना पूर्ण होईल. जुनी उधारी वसूल होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा.

कन्या:-

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. बचतीच्या योजना आखाव्यात. अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल.

तूळ:-

महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. समोरील गोष्टीत आनंद माना. मुलांची प्रगती दिसून येईल.

वृश्चिक:-

वादाचा मुद्दा पट‍वून देऊ नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात चांगल्या संधि प्राप्त होतील. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.

धनू:-

मुलांकडून सुवार्ता मिळतील. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधि प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या.

मकर:-

विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल.

कुंभ:-

बोलताना भान हरवू नका. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी

मीन:-

प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा. आततायीपणे निर्णय घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी नाते दृढ होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope 18 november daily astrology rashi bhavishya in marathi jap

First published on: 17-11-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×