दैनिक राशिभविष्य: 18 September 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

कामामध्ये अतिदक्षता बाळगा. आपल्या विचारांशी ठाम रहा. इतरांना मदत करून समाधान मिळेल. कार्यक्षेत्रात झालेला बदल स्वीकारावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

वृषभ:-

आपण हातात घेतलेले काम पूर्ण होईल. इतरांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. जुन्या मित्राची भेट मन प्रसन्न करेल.

मिथुन:-

आपला निर्णय इतरांवर लादू नका. उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. बौद्धिक कौशल्य दाखवायला मिळेल.

कर्क:-

अडकलेली येणी वसूल होतील. समोरच्या व्यक्तीचा आदर करावा. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. अपचनाचा त्रास संभवतो.

सिंह:-

नवीन गोष्टींचे दडपण घेऊ नका. आपला आत्मविश्वास जागृत ठेवावा. मुलांच्या जबाबदार्‍या सक्षमतेने पूर्ण कराल. व्यापार, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना लाभ मिळतील. आहारावर नियंत्रण ठेवावे.

कन्या:-

कामाचा आधी संपूर्ण अभ्यास करावा. गरज वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. चांगल्या गोष्टींसाठी झालेला खर्च मन प्रसन्न करेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन सुखमय होईल.

तूळ:-

मनातील विचार इतरांना बोलून दाखवा. अडचणीच्या काळात मनातील व्यक्ती साथ देईल. उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. करमणुकीकडे अधिक लक्ष राहील.

वृश्चिक:-

ठामपणे आपले विचार मांडाल. कोणाच्या दडपणाखाली राहू नका. आर्थिक बाजू भक्कम होईल. सन्मानात वाढ होईल. मित्राची भेट समस्येचे निराकरण करणारी ठरेल.

धनू:-

तुमचा सल्ला लोक विचारात घेतील. काम अधिक वेळ ताणू नका. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगा. जवळचा प्रवास घडेल.

मकर:-

नवीन कार्य करण्याची तयारी दाखवाल. तुमच्या कामात कुशलता दिसून येईल. व्यवसायिकांना अनुकूल दिवस. आर्थिक बाजू भक्कम होईल. वाहन चालवताना सावध राहावे.

कुंभ:-

अवघड गोष्टीत अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा. दिवस धावपळीचा राहील. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. स्वत:साठी देखील वेळ काढावा. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हित लक्षात घ्या.

मीन:-

कोणत्याही कामाचा तिटकारा करू नका. मनाची व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराचा पाठिंबा राहील. लहान प्रवास सत्कारणी लागेल. बोलतांना भान विसरू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader