Daily Rashibhavishya in Marathi, 19 November  2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

बोलताना आपला मुद्दा स्पष्ट मांडा. रचनात्मक कार्याची चुणूक दाखवा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. प्रेम सौख्यात वाढ होईल. घरगुती वातावरण आनंदी असेल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

वृषभ:-

आपले मानसिक आरोग्य बिघडवू नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. स्थावर मालमत्तेतून लाभ संभवतो. दिवस आपल्या आवडी प्रमाणे घालवा. कुटुंबातील सदस्य चांगल्या बातम्या देतील.

मिथुन:-

खेळ व कला यांमध्ये वर्चस्व राहील. अनपेक्षित खर्च सामोरी येतील. मानसिक सौख्याला प्राधान्य द्या. व्यापारी वर्गाने भागीदारीकडे अधिक लक्ष द्यावे. पित्त प्रकृतीत वाढ संभवते.

कर्क:-

आपले हितचिंतक पारखून घ्या. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रलंबित येणी वसूल होऊ शकतील. काही परिवर्तन सकारात्मक ठरतील. घरात टापटीप ठेवाल.

सिंह:-

आपली स्वप्ने सत्यात उतरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. कामे मनाजोगी पार पडतील.

कन्या:-

घरामध्ये शांतता नांदेल. दिवस आनंदात जाईल. अधिक ऊर्जा व उत्साहाने कामे कराल. कामातील बदल आनंद देईल. मन प्रसन्न राहील.

तूळ:-

आपल्या स्वत:साठी काही खर्च कराल. हितशत्रू कडे दुर्लक्ष करू नका. मानसिक आरोग्य जपावे. खर्चाचा ताळमेळ साधावा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

वृश्चिक:-

आपल्याच मतावर अडून राहाल. चारचौघांत कौतुक होईल. आवडत्या व्यक्तीची साथ मिळेल. तुमचा रूबाब वाढेल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल.

धनू:-

आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. मोहाला बळी पाडू नका. कामातून आनंद शोधाल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर:-

जिद्द व चिकाटी सोडू नका. जुगारात धनलाभ संभवतो. विवाहाचे प्रस्ताव पुढे येतील. व्यापारातील नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये कामाकडेच पूर्ण लक्ष द्या.

कुंभ:-

खरेदीचे निर्णय लांबणीवर टाकाल. व्यवहारात गल्लत करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. घरातील वातावरण सकारात्मक असेल. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च कराल.

मीन:-

प्रलंबित येणी मिळतील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त प्रवास घडेल. व्यापारात नवीन धोरण ठरवाल. ध्येयाचा पाठलाग करा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader