दैनिक राशिभविष्य: 2 October 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. सहकार्‍यांच्या हातात हात घालून चला. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
budhaditya rajyog 2024 | rajyog in horoscope astrology
१७ नोव्हेंबरनंतर ‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोगामुळे करिअरमध्ये प्रगती अन् उत्पन्न होणार दुप्पट!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरेल लाभदायक? बाप्पा करणार का तुमच्या इच्छा पूर्ण; वाचा सोमवारचे राशिभविष्य
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Sharad Pawar Astrological Predictions: विधानसभा निवडणुकीत यश आणि प्रसिद्धी… काय सांगते शरद पवार यांची कुंडली, ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात…

वृषभ:-

अकारण पैसा खर्च होऊ शकतो. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही. कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

मिथुन:-

मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची चंगळ राहील. जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल.

कर्क:-

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या.

सिंह:-

जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल.

कन्या:-

आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.

तूळ:-

कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकांवरती प्रभाव पाडाल. झोपेची तक्रार जाणवेल. समस्यांना संयमाने तोंड द्या.

वृश्चिक:-

लोक तुमचा सल्ला विचारायला येतील. अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. फक्त कामावरच लक्ष केंद्रित करा. आर्थिक चिंता मिटेल.

धनू:-

मदत केल्याचा आनंद मिळवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

मकर:-

नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. कमिशनच्या व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. भावंडांशी मतभेद टाळा.

कुंभ:-

मनातील निर्णय जोडीदारासमोर मांडा. तिखट शब्दांचा वापर टाळा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. जुन्या विचारांना चिकटून राहू नका.

मीन:-

क्षुल्लक गोष्टी नजरेआड करा. जोडीदाराशी शांतपणे वार्तालाप करा. अती उत्साह दाखवायला जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. उष्णतेचे त्रास संभवतात.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.