scorecardresearch

Premium

Daily Horoscope: मीनसाठी दिवस फलदायी तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक मतभेद टाळावेत

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींना योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल.

Daily Horoscoper 20 September 2023
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२३ (फोटो- Freepik)

दैनिक राशिभविष्य: 20 September 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

आळस झटकून कामाला लागा. योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ संभवतो. सहकार्‍यांशी मतभेदाची शक्यता.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

वृषभ:-

आवडीचे पदार्थ खाल. आर्थिक योजना पूर्ण होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन:-

फसवणुकीपासून सावध रहा. धरसोड वृत्ती कमी करावी.. एखादी घटना मन खिन्न करू शकते. चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल. दिवसभर कामाची धांदल राहील.

कर्क:-

दिवसाचा बहुतांश वेळ मजेत जाईल. ग्रहांची अनुकूल स्थिती लाभदायक ठरेल. हातातील कामे विनासायास पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा दूर होईल.

सिंह:-

साधे आणि सरळ जीवन मार्गक्रमीत कराल. सतत आशावादी राहावे. महत्त्वाच्या कामाच्या नोंदी तपासून पहाव्यात. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. संमिश्र घटनांचा दिवस.

कन्या:-

दुसर्‍यांच्या उपयोगी याल. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. दूरच्या नातेवाईकांची खुशाली समजेल. जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल.

तूळ:-

तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. झोपेची तक्रार जाणवेल. नातेवाईकांमध्ये सलोखा जपावा.

वृश्चिक:-

उगाच चिडचिड करू नये. संयमी भूमिका घ्यावी. मुलांसोबत दंगामस्ती कराल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

धनू:-

आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. सरकारी कामे अधिक वेळ खातील. नवीन मित्र जोडले जातील. तरुणांच्यात सामील व्हाल. एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल.

मकर:-

जुन्या गोष्टींची खिन्नता बाळगू नका. जवळचा प्रवास कराल. कौटुंबिक मतभेद टाळावेत. कामाचे नवीन धोरण ठरवावे. काटकसरीपणा अंगी बाळगावा.

कुंभ:-

आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. भागिदारीतून लाभ मिळेल. मनाची चंचलता जाणवेल.

मीन:-

दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्या. आजचा दिवस उत्तम फलदायी राहील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×