Daily Rashibhavishya in Marathi, 21 November  2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

भागीदारीतील व्यावसाईकांना फायदा होईल. वैवाहिक समस्या दूर होतील. मुलांसोबत वेळ आनंदात घालवाल. सामाजिक मान सन्मान वाढेल. व्यापार्‍यांना लाभ संभवतो.

shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
Kark Rashifal 2025
Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?
6 December astrological predictions for zodiac signs
६ डिसेंबर पंचांग: श्रवण नक्षत्रात जुळून येणार धनवृद्धीचे योग तर ‘या’ राशींना मिळेल प्रेमाची साथ; शुक्रवारी तुमचे भाग्य कसे चमकणार?

वृषभ:-

किरकोळ इजा संभवते. घरातील लोकांची मने जिंकू शकाल. नवविवाहिताना चांगला दिवस जाईल. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन:-

आजचा दिवस संमिश्र जाईल. मुलांची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात. प्रेमिकांसाठी सौख्यकारक दिवस. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.

कर्क:-

कौटुंबिक सौख्य लाभेल. ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल. तुमच्या तक्रारी दूर केल्या जातील. थोरांचे मार्गदर्शन मिळेल. आवडीची भेट वस्तु मिळेल.

सिंह:-

आजचा दिवस उत्साही असेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. मित्रांसोबत पार्टीचे बेत आखाल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा होतील. आतताईपणे वागू नये.

कन्या:-

सामाजिक स्तरावर चांगले परिणाम दिसतील. बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल. व्यवसायात घरातील लोकांचे सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होतील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

तूळ:-

मानसिक चंचलतेला आवर घाला. जोडीदारासोबत खरेदीला जाल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत घालवाल. घरगुती कामात उत्साहाने हातभार लावाल.

वृश्चिक:-

मानसिक चंचलता जाणवेल. जुनी गुंतवणूक उपयोगास येईल. महत्त्वाची खरेदी शक्यतो टाळावी. वेळेचा सदुपयोग करावा. दूरदृष्टीकोण बाळगावा.

धनू:-

विविध स्तरातून लाभ होईल. थोरांकडून कौतुकास पात्र व्हाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. वडील भावंडांची भेट होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मकर:-

दिवस घरात शांततेत जाईल. व्यावसायिक लोक दिवसभर व्यस्त राहतील. जवळचे नातेवाईकांचे आगमन होईल. दिवस आनंदात जाईल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

कुंभ:-

आजचा दिवस उत्तम जाईल. व्यावसायिक लोक नवीन काम हाती घेऊ शकतात. तज्ञ लोकांचा सल्ला मिळेल. विद्यार्थ्यानी महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. वडीलधार्‍यांशी मतभेद टाळा.

मीन:-

मन काहीसे अस्थिर राहील. अचानक धनलाभाची शक्यता. खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. मोहाला बळी पडू नका. मनातील साशंकता दूर करा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader