Daily Rashibhavishya in Marathi, 22 November 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
आजचा दिवस आळसात जाईल. जोडीदारासोबत पुढील गोष्टींचे नियोजन कराल. महिला थोडा हात आखडता घेऊन वागतील. वेळेचा सदुपयोग कराल. जास्त विचार करत बसू नका.
वृषभ:-
मानसिक चिंता सतावेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. कामात जरासा सुस्तपणा जाणवेल. गोडीने सर्वांना जिंकून घ्यावे. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.
मिथुन:-
मुलांना काही नवीन गोष्टी शिकवाल. त्यांच्या सोबत वेळ घालवून मस्त वाटेल. विद्यार्थी वर्ग खुश असेल. प्रिय व्यक्तिसोबत फिरायला जाल. हाताखालील लोक चोख काम करतील.
कर्क:-
आईचा सहवास लाभेल. जोडीदारासोबत फिरायला जाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस समाधानात जाईल.
सिंह:-
काल्पनिक जगात रमून जाल. मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल. तरुण वर्ग आळसात दिवस घालवेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. भावंडांमधील सामंजस्य वाढीस लागेल.
कन्या:-
एकाच वेळी अनेक कामे अंगावर घ्याल. घरातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. बोलण्यात गोडवा ठेवाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. छोटासा घरगुती कार्यक्रम होईल.
तूळ:-
तुमच्यातील सर्जनशीलता वाढीस लागेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या कामात रस घ्याल. आवडते पुस्तक वाचनात येईल. दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक:-
आध्यात्मिक बाबतीत रुचि वाढेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. परदेशी कंपनीत काम करणार्यांना दिवस फलदायी असेल. वैचारिक शांतता जपावी.
धनू:-
आजचा दिवस आनंदी असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. थोरांचा सल्ला मिळेल. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील.
मकर:-
कामात अति घाई करू नका. शांततेचा मार्ग अंगिकारावा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. आपली क्षमता सुधारण्यावर भर द्यावा. नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे.
कुंभ:-
जुनी कामे तडीस जातील. दानधर्म करता येईल. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. कोर्टाशी संबंधित कामे पुढे सरकतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.
मीन:-
गूढ शास्त्रात रस घ्याल. उच्च शिक्षण घेणार्यांना फायदा होईल. पैज जिंकता येईल. जुगारात लाभ संभवतो. पोटाच्या तक्रारी संभवतात.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.