Aajche Rashi Bhavishya 25 january 2026 In Marathi : आज २५ जानेवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असणार आहे. त्याचबरोबर सिद्धी योग जुळून येईल आणि रेवती नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ११ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते ११ वाजून १३ मिनिटांपर्यंत असेल. रविवार तुमच्या राशीचा कसा जाणार चला जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, २५ जानेवारी २०२६ (Rashi Bhavishya In Marathi 25 january 2026 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)
तुमच्या मताला दुजोरा दिला जाईल. उत्तम मानसिक स्वास्थ लाभेल. प्रवास मजेत होईल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आवडीचे पदार्थ खाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)
दिवस प्रसन्नतेत घालवाल. कामात मनाजोगे यश येईल. भावंडांचे सौख्य लाभेल. उगाचच होणारी चिडचिड टाळावी. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)
सार्वजनिक कामात मदत कराल. जामीनकीचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. चोरांपासून सावध राहावे. फार काळजी करत बसू नये. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)
मित्रमंडळीच्या गोतावळ्यात रमाल. मनातील इच्छा पूर्ण कराल. आर्थिक चिंता मिटेल. कामात आळशीपणा करू नये. काहीशी चैन करण्याकडे कल राहील.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आर्थिक लाभावर लक्ष द्याल. सामाजिक वजन वाढेल. सामाजिक वजन वाढेल. कामाचा थकवा जाणवेल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)
तुमचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. आर्थिक अडचण दूर होईल. मदतीचा आंनद मिळवाल. निराशा दूर सारावी. खर्चाला आवर घालवी.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)
अचानक लाभ होतील. कामाच्याबाबतीत संयम राखावा लागेल. काही कामे पुढे ढकलली जातील. कौटुंबिक समाधान लाभेल. व्यावसायिक वाढीचा विचार करावा.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)
कौटुंबिक सौख्य वाढेल. भागीदारीतून चांगला फायदा संभवतो. एकमेकातील आकर्षण वाढीस लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. वैवाहिक सौख्याचा आनंद घ्याल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
नातेवाईकांच्या गोतावळ्यात रमाल. कामे अपेक्षेनुसार पार पडतील. इतरांवर अवलंबून राहू नका. मित्रांची मदत मिळेल. मनाची विशालता दाखवाल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)
प्रेमसौख्याला उधान येईल. मैत्री अधिक दृढ होईल. करमणुकीची मजा घ्याल. तुमचा जनसंपर्क वाढेल. आपले मत योग्य प्रकारे मांडू शकाल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)
थोरामोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. आत्मिक आनंदावर भर द्याल. मानसिक समाधान लाभेल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. कौटुंबिक सौख्याचा लाभ होईल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)
कामावर चांगले लक्ष केद्रित करता येईल. लिखाणाला अधिक उर्जा मिळेल. प्रवास सुखाचा होईल. कामाचा मोबदला चांगला मिळेल. भावंडांमधील आपुलकी वाढीस लागेल.
