scorecardresearch

Premium

Daily Horoscope: अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘या’ राशींचे नशीब चमकणार, नव्या नोकरीची संधी चालून येणार; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींनी द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकलावेत.

Daily Horoscope 28 September 2023
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२३ (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दैनिक राशिभविष्य: 28 September 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

काही प्रश्न मार्गी लावाल. मुलांच्या बाबत चिंता लागून राहील. सामाजिक वादात पडू नका. दिवसभर धावपळ करावी लागेल. गरजूंना मदत केल्याचा आनंद मिळेल.

Daily Horoscoper 19 September 2023
Daily Horoscope: गणेश चतुर्थीनिमित्त ‘या’ राशीच्या व्यक्तींची अनेक कामे लागणार मार्गी, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य
Daily Horoscoper 18 September 2023
Daily Horoscope: कर्कची अडकलेली येणी वसूल होणार तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये; पाहा तुमचे भविष्य
Daily Horoscoper 16 September 2023
Daily Horoscope: शनिवारी कर्कला भागीदारीत फायदा होणार तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी अति साहस करणे टाळावे
Daily Horoscoper 15 September 2023
Daily Horoscope: मेषसाठी दिवस अनुकूल तर ‘या’ राशीच्या व्यक्तींचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, पाहा भविष्य

वृषभ:-

कुटुंबासोबत दिवस मजेत घालवाल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल. वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू स्थिरावेल. कामातील अडचणी दूर करू शकाल.

मिथुन:-

जोडीदाराकडून लाभ होईल. आवडती वस्तू बरेच दिवसांनी सापडेल. आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. व्यापारात नवीन भागीदार सापडेल. अनेक जबाबदार्‍या पार पाडाल.

कर्क:-

विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य आणावे. त्यामुळे मार्ग सहज सापडेल. कुटुंबासाठी खर्च कराल.

सिंह:-

मित्रांकडून अनपेक्षित लाभ संभवतात. सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. सहकार्‍यांशी वादात पडू नका. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कन्या:-

कामातील बदल लक्षात घ्या. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील.

तूळ:-

कामानिमित्त छोटे प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान,सन्मान वाढीस लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. विरोधक पराभूत होतील.

वृश्चिक:-

आरोग्याची वेळच्यावेळी काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. तुमचा उद्देश साध्य होईल. सारासार विचार करून घेतलेला निर्णय योग्य ठरेल.

धनू:-

भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील. द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला. वैचारिक दिशा बदलून पहा. भावंडांची मदत घ्याल.

मकर:-

नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही. कामात झालेले नुकसान भरून काढाल. नवीन योजना आखताना सावधानता बाळगा.

कुंभ:-

विद्यार्थ्यांना उत्तम काळ. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. नातेसंबंध दृढ होतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

मीन:-

घरासंबंधी कामे मार्गी लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. ज्ञान वाढीस लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope 28 september 2023 daily astrology rashi bhavishya in marathi tmb 01

First published on: 27-09-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×