Aajche Rashi Bhavishya 30 january 2026 In Marathi : आज ३० जानेवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असणार आहे. त्याचबरोबर वैधृती योग जुळून येईल आणि आद्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल. शुक्रवार तुमच्या राशीसाठी काय घेऊन येणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ३० जानेवारी २०२६ (Rashi Bhavishya In Marathi 30 january 2026 )
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
संयम सोडून चालणार नाही. तुमच्या हतबलतेचा इतरांना फायदा होवू शकतो. अति उत्साह चांगला नाही. शांततेचे धोरण ठेवावे लागेल. प्रेमसंबंधात सावधानता बाळगावी.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. चांगले वाहन सौख्य लाभेल. जमिनीची कामे पार पडतील. गृह्सौख्याकडे लक्ष द्यावे. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. अधिकाराचा वापर कराल. अधिक जबाबदारीने वागाल. प्रवासात काळजी घ्यावी. मैत्रीतील कटुता टाळावी.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
सारासार विचार करून बोलावे. वायफळ खर्च टाळावा. चोरांपासून सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
महत्त्वकांक्षा वाढेल. काही कामात अडचण येवू शकते. भावनेच्या आहारी जावू नका. अधिकारवाणीने आपले स्थान प्रस्थापित कराल. संयम सोडू नका.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
एककल्ली विचार करू नका. वायफळ बडबड करू नये. सार्वजनिक गोष्टींचे भान राखावे. सामाजिक जाणीवेपोटी काही कामे हातात घ्यावी लागतील. उघडपणे बोलू नका.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
हाती आलेल्या संधीचे सोने करावे. ओळखीने कामे होतील. भडक मत मांडू नका. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
कलेला चांगला वाव मिळेल. मानसिक सौख्य लाभेल. वडीलधार्यांचे मात घ्यावे. कामाचे स्वरूप लक्षात घेऊन नियोजन करावे. सन्मानास पात्र व्हाल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
जोडीदाराविषयी होणारे गैरसमज दूर करावेत. अति घाई उपयोगाची नाही. जबाबदारीची जाणीव ठेवाल. वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करावे. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
जुन्या गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीला नावे ठेवू नयेत. तुमच्यातील उदारपणा दाखवावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. चटकन मत बनवू नका.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
उताविळपणा करू नका. चर्चेवर अधिक भर द्यावा. सामोपचाराने गोष्टींकडे पहावे. एकमेकांतील प्रेमभावनेची जपणूक करावी. हट्टीपणा दूर सारावा..
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
कामातील बदल अनुकूल ठरेल. नोकरांची उत्तम साथ लाभेल. चुगलीखोर लोकांकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांचे प्रश्न समोर येतील. हातातील कामास यश येईल.

