Daily Horoscope 31 March 2026 In Marathi : आज ३१ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. त्याचबरोबर गंड योग जुळून येईल आणि फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ५ वाजता सुरु होईल ते ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. मार्च महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ३१ मार्च २०२६ (Horoscope Today 31 March 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

वाहन जपून चालवावे. डोके शांत ठेवून काम करावे. गरज पडल्यास चार पाऊले मागे यावे. लबाड लोकांपासून दूर राहावे. जोडीदाराचा आधार सुखावणारा असेल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

व्यापारात चांगली प्रगती करता येईल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. सत्संग सारख्या गोष्टीत मन रमेल. पित्ताचा त्रास वाढू शकतो. शक्यतो संघर्षाचे वातावरण टाळावे.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

जवळच्या मित्रांच्या गाठी पडतील. आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. औद्योगिक चढउतार जाणवतील. पैसे गुंतवताना काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी आपली पत सांभाळावी.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

भागीदारावर फार अवलंबून राहू नका. जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. लहान-सहान गोष्टीचा विपर्यास करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. चित्त स्थिर ठेवावे लागेल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

व्यावसायिक वातावरणाचा अंदाज घ्यावा. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मोठी उडी घेतांना विचार करावा. आवक-जावक याचा योग्य अंदाज घ्यावा. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

शेजार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. स्वत:कडे दुर्लक्ष करू नये. मुलांना स्वच्छतेचे वळण लावावे. अति धाडस करू नये. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

दिवस आनंदात जाईल. मन व बुद्धी यांचा समतोल राखावा. स्थावरचे काही प्रश्न उदभवू शकतात. घरगुती गैरसमज दूर करावेत. मुलांशी मतभेद होतील.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

हातापायाला किरकोळ इजा संभवते. कामातील क्षुल्लक चुका टाळाव्यात. धोरणीपणाने वागावे लागेल. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. सकारात्मक विचार करावेत.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

कौटुंबिक कामाची दगदग वाढेल. संभाषणाची आवड पूर्ण कराल. काही कामे खिळून पडतील. छोट्या कारणांवरून गैरसमज करून घ्याल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

कामाचा व्याप वाढता राहील. व्यावसायिक उलाढाल वाढेल. प्रवासाची जोखीम शक्यतो घेऊ नये. चिकाटी सोडू नका. स्थावरची कामे मार्गी लागतील.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

नातेवाईकांचा त्रास संभवतो. घरात शोभेच्या वस्तु आणाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. आध्यात्मिक बळ वाढेल. वारसाहक्काची कामे मार्गी लागतील.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. स्वभावातील हेकेखोरपणा वाढू शकतो. प्रवासाचा आनंद घ्याल. मनावरील दडपण
बाजूला सारावे. तुमच्या बोलण्याला धार येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर