Rashi Bhavishya 4 April 2026 In Marathi : आज ४ एप्रिल २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. त्याचबरोबर हर्षण योग जुळून येईल आणि स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ०० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. शनिदेव
आजचे पंचांग व राशिभविष्य, ४ एप्रिल २०२६ (Dainik Rashi Bhavishya 4 April 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
कामातील उत्साह व जोम वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. नवीन संधि उपलब्ध होतील. कागदपत्रांची नीट छान नि करावी. आवडी निवडीबाबत दक्ष राहाल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
प्रत्येक गोष्टीचा आनंद उठवाल. कामात अधिक आवडीने रस घ्याल. तोंडात साखर ठेवून वागाल. हौसे खातर खर्च कराल. करमणुकीचे कार्यक्रम आखाल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
अधिकारी वर्गाचा सल्ला घ्यावा. मोठ्या लोकांची गाठ घ्याल. कमिशन मधून फायदा होईल. बरेच दिवसांची सुप्त इच्छा पूर्ण होईल. संपर्काचा फायदा करून घ्याल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराची कमाई वाढेल. लेखक वर्गाला चांगला फायदा होईल. बुद्धिकौशल्याने मन जिंकून घ्याल. तुमचे कसब कामाला लावाल. कामात स्त्री वर्गाची मदत होईल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
कलाकारांचे कौशल्य दिसून येईल. वरिष्ठांना खुश करू शकाल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. वेळेचा योग्य सदुपयोग कराल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. चर्चेतून योग्य मार्ग निघेल. कौटुंबिक प्रश्न समजूतदारपणे हाताळाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. भागीदारीत नवीन योजना आखाल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील. कमी श्रमात कामे पूर्ण करता येईल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधावा. देणी भागवता येतील.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
एककल्ली विचार करू नका. अती आग्रह बरा नव्हे. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवावे. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
दिवस मना प्रमाणे घालवाल. बोलताना सारासार विचार करावा. घरगुती कामे अंगावर पडतील. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
उष्णतेचे विकार संभवतात. पचनास हलके पदार्थ खावेत. डोके थंड ठेवावे लागेल. फार काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. उगाचच चिडचिड करू नये.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
आरोग्यात सुधारणा होईल. कामाचा आनंद घेता येईल. हातातील अधिकाराचा वापर करता येईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल. चैनीची आवड जोपासाल.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
गप्पांमध्ये रमून जाल. हसत-हसत कामे पूर्ण कराल. निसर्ग सानिध्याची ओढ वाढेल. सामाजिक गोष्टीत हातभार लावाल. मित्रांची नाराजी गोडीने दूर करावी.
