दैनिक राशिभविष्य: 4 October 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
जोडीदाराच्या सहकार्याने काम पूर्ण कराल. घरातील मोठ्या कामाला गती येईल. मुलांची कृती मनाला लागू शकते. इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. मन विचलीत होऊ शकते.
वृषभ:-
विकतची दुखणी घेऊ नका. विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल. उगाच नसते विचार करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल
मिथुन:-
इतरांचा विश्वास संपादन करावा. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रयत्नात कसूर करू नका. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. सावधगिरी बाळगून कामे करावीत.
कर्क:-
छानशौकीपणावर खर्च कराल. खर्चावर ताबा ठेवावा. संयम आणि धिराने परिस्थिती हाताळा. दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी असेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह:-
लोकांना योग्य सल्ला द्याल. जबाबदारीने काम कराल. उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्यांचा पाठिंबा मिळेल. हितशत्रू माघार घेतील.
कन्या:-
आक्रमकतेने बोलू नका. व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मदतीचा हात पुढे कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
तूळ:-
भागीदारीत सबुरीने घ्यावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. हिशोबात चोख राहाल. अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तीची गाठ पडेल.
वृश्चिक:-
जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. मित्रांचा सल्ला ऐकावा. मेहनतीचे कौतुक केले जाईल. कामावर लक्ष केन्द्रित करणे गरजेचे. एकूणच आजचा दिवस संमिश्र राहील.
धनू:-
रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मनातील अनामिक भीती दूर होईल. दुपारनंतर धावपळ करावी लागेल. नवीन ओळख मैत्रीत बदलेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
मकर:-
विचारांना चांगली दिशा द्याल. मनात नवीन कल्पना रुजतील. कामे विलंबाने सुरू करू नका. चिकाटी व संयम कायम ठेवा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
कुंभ:-
मनातील संभ्रम दूर करावा. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.
मीन:-
कौटुंबिक समतोल साधावा. भागीदारीच्या कामात अधिक वेळ द्यावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जुने कामे आधी पूर्णत्वास न्या. मन विचलीत होणार नाही याची दक्षता घ्या.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.