Today Horoscope 6 February 2026 In Marathi : आज ६ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. चतुर्थी तिथी बुधवारी १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु झाली असून आज रात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर धृती योग जुळून येईल आणि हस्त नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ११ वाजता सुरु होईल ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमच्या राशीचा शुक्रवार कसा जाणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ६ फेब्रुवारी २०२६ (Sankashti Chaturthi Daily Horoscope 6 February 2026)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

आपली छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

मानसिक चंचलता जाणवेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. घरात अधिकारी व्यक्तींची ऊठबस होईल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

जोडीदाराविषयी मनातील शंका दूर साराव्यात. भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. अवास्तव अपेक्षा मनात बाळगू नका. मतभेदापासून दूर रहा.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

कामात चंचलता आड आणू नका. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. नातेवाईकांना सढळ हाताने मदत कराल. हाताखालील लोकांची उत्तम साथ मिळेल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विलंबावर मात करावी. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाची अचूक दखल घेतली जाईल. बौद्धिक छंद जोपासाल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

अचानक धनलाभ संभवतो. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांची तोंडे बंद होतील मुलांचे साहस वाढेल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेम सौख्यात वाढ होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. बौद्धिक ताण जाणवेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

बोलतांना भान राखावे. कौटुंबिक जबाबदारी वाढीस लागेल. खर्चाला आवर घालावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. मित्रांचा गोतावळा जमवाल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

जास्त चौकसपणा दाखवाल. प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल. सरकारी कामे वेळेत पूर्ण करता येतील. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. चिकाटी सोडून चालणार नाही. जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी. धाडसी शब्द वापराल. अति चिकित्सा करू नका.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल. धूर्तपणे वागण्याकडे कल राहील. फार हट्टीपणा करू नका. कामात तत्परता दाखवावी.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कागदपत्रांची योग्य छानणी करावी. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर